सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ज्वारीच्या शेतात गांजाची लागवड, पोलिसांनी केली कारवाई; साडेचार लाखांचा गांजा जप्त

धडगाव : ज्वारीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याचा प्रकार कंज्यापाणी, ता. धडगाव येथे उघडकीस आला.

Nandurbar MH
  • Sep 16 2021 4:56PM


 धडगाव : ज्वारीच्या पिकात गांजाची झाडे लावल्याचा प्रकार कंज्यापाणी, ता. धडगाव येथे उघडकीस आला. पोलिसांनी चार लाख ५३ हजार ३२० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली असून शेत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिलदार फाड्या पावरा मु. कंज्यापाणी पोस्ट काकडदा ता. धडगाव असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने कंजापानी गावाचे शिवारातील ज्वारी पीक असलेल्या शेतामध्ये विनापरवाना बेकायदेशीररीत्या गांजा रोपांची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मिळाली होती. एलसीबी व धडगाव पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत गांजाची झाडे जप्त करण्यात आली. ६४ किलो वजनाची आणि चार लाख ५३ हजार ३२० रुपयांची झाडे पोलीसांनी जप्त केले आहे. शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करणेची कारवाई सुरू आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, हवालदार अनिल गोसावी, दीपक गोरे, रवींद्र पाडवी, जितेंद्र अहिरराव यांच्या पथकासह धडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकुळ औताडे, हवालदार राजेंद्र जाधव, विनोद पाटील, राजेश्वर भुसलवाड यांच्या पथकाने कारवाई केली.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार