सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्य मुक्त विद्यालयामुळे शाळा बंद पडण्याची भीती

माजी शिक्षक आमदार डी. के. देशमुख यांचे मत

Abhimanyu
  • Nov 18 2022 9:23AM
राज्य शासनाने वंचित मुलांसाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याच्या धोरणास नुकतीच मान्यता दिली आहे, या धोरणामुळे ग्रामीण भागातील मराठी माध्यमांच्या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा पटसंख्या कमी झाल्यामुळे बंद पडतील, अशी भीती मराठवाड्याचे माजी शिक्षक आमदार डी. के. देशमुख यांनी व्यक्त केली.
सध्या राज्य शासनाचे शिक्षणाबाबतचे धोरण राज्य प्रगतीच्या दृष्टीने कमी पडत असल्याची खंतही श्री. देशमुख यांनी व्यक्त केली.

सध्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे शिक्षणापासून दूर असलेली मुले-मुली शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. अनेक भागांत नवीन शैक्षणिक धोरणामुळे मुले-मुली शाळा सोडून जाऊ शकतात, मुक्त विद्यालयामुळे मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे काय होणार, असा प्रश्नही श्री. देशमुख यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागात शाळांची पटसंख्या कमी होऊन मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडतील, राज्य शासनाने कौशल्य शिक्षणाच्या नावाखाली क्रीडा व कला शिक्षणाला खो दिला असून याचा विचार करून स्वतंत्र शिक्षक कला व क्रीडा शिक्षणासाठी दिला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार