सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देशभक्त श्यामाप्रसाद

देशाची अखंडता व एकता अबाधित रहावी, या देशात दोन संविधान, दोन पंतप्रधान चालणार नाही, यासाठी काश्मिरात जाऊन जनजागरण करणारे देशभक्त श्यामाप्रसाद मुखोपाध्याय (मुकर्जी) यांचा आज जन्मदिवस.

लक्ष्मणलाल खत्री 88061 22655
  • Jul 6 2020 11:08PM
देशाची अखंडता व एकता अबाधित रहावी, या देशात दोन संविधान, दोन पंतप्रधान चालणार नाही, यासाठी काश्मिरात जाऊन जनजागरण करणारे देशभक्त श्यामाप्रसाद मुखोपाध्याय (मुकर्जी) यांचा आज जन्मदिवस.
देशात काँग्रेसला समर्थ पर्याय देणारा, खर्‍या अर्थाने लोकाभिमुख पक्ष मिळावा, म्हणून 1952 मध्ये अखिल भारतीय जनसंघाची स्थापना केली. त्याचे संस्थापक प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीचे श्यामाप्रसाद मुखोपाध्याय होत. त्यावेळेची परिस्थिती प्रतिकूल होती. गांधी हत्येचे निमित्त करून ठिकठिकाणी हिंदुत्ववाद्यांना झोडपण्याचे सत्र सुरू होते. हिंदू महासभेचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही त्या खटल्यात गोवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बंदीच्या दिव्यातून सुटला होता. आंतरिक सरकार स्थापन करण्यासाठी झालेल्या निवडणुकीत मुस्लीमबहुल मतदारसंघातून मुस्लीम लीग यशस्वी झाली, तर हिंदुबहुल मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली होती. हिंदू महासभेची पुरती वाट लागली होती.
त्या काळात फाळणी मान्य नसणारे जे अखंड भारतवादी काँग्रेसमध्ये होते असे राजषीर्र् पुरुषोत्तमदास टंडन, थोर विचारवंत डॉ. कन्हैयालाल मुन्शी तसेच गोविंदवल्लभ पंतांसारखे असंख्य नेते होते. त्यांना पंडित नेहरूंचे नेतृत्व नको होते. त्याकाळात राजषीर्र् टंडन मुंबईस स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही भेटले होते. सावरकर व टंडन यांच्यात भूतपूर्व सांसद व उद्योगपती बिशनचंद्र सेठ यांनी प्रदीर्घ चर्चा घडवली होती. त्यावेळी अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखोपाध्याय होते.
या देशात विविध धर्म पंथाचे लोक असल्याने केवळ  हिंदूंचाच विचार करणे अव्यवहार्य आहे असे ज्येष्ठ नागरिकांना वाटत होते. आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया यांच्यासारखे समाजवादी यांनी आपली वेगळी वाटचाल सुरू केली होती. देशात विशेषत: महाराष्ट्रात हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे जनसामान्य संशयाने पाहत होते, म्हणून आता हिंदू महासभेने एक तर नामांतर करावे आणि पक्षात मुस्लीम व ईसाई यांना प्रवेश द्यावा, असा मानस हिंदूराष्ट्रपती श्यामाप्रसाद मुखोपाध्याय यानी सावरकरांजवळही व्यक्त केला होता.
‘हिंदुराष्ट्रपती’ म्हणजे हिंदू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षांना हिंदुराष्ट्रपती संबोधण्याची प्रथा होती. अर्थातच सामाजिक गरज म्हणून 1952 मध्ये नवा पर्याय म्हणून जनसंघ अवतरला. संघातील पं. दीनदयाल उपाध्याय, पितांबर दास, अर्थशास्त्रीय शब्दांचा हिंदी शब्दकोष करणारे प्राध्यापक रघुवीर अटलबिहारी आदी कितीतरी विचारवंत जनसंघात सहभागी झाले तर उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील हिंदू महासभेचे नेतेही जनसंघात सहभागी झाले. तर जनसंघास शक्ती मिळाली ती संघ परिवारातूनच. त्यात अटलबिहारी वाजपेयी, बच्छराज व्यास, पं. मौलिचंद्र शर्मा, दीनदयाल उपाध्याय, वसंतराव ओक यांचा समावेश होता. 
जेव्हा नवा पक्ष स्थापनेसाठी व त्याचे नाव ठरविण्यासाठी ऐतिहासिक बैठक झाली त्यात स्नेहवश श्यामाप्रसादांनी हिंदूमहासभेचे नेते उद्योगपती बिशनचंद्र सेठ व प्रा. वि. घ. देशपांडे यांनादेखील बोलावले होते. इतिवृत्त व उपस्थितीच्या पुस्तकात त्या नेत्यांनी स्वाक्षरीदेखील केली होती. मात्र ते त्यावेळी, नव्या पक्षात न जाता हिंदू महासभेतच राहिले. प्रा. वि. घ. देशपांडे 1952 च्या निवडणुकीत ग्वाल्हेरमधून व बिशनचंद्र सेठ 1962 च्या निवडणुकीत उत्तरप्रदेशातून हिंदूमहासभेच्या वतीने लोकसभेत निवडून गेले होते.
नवा पक्ष स्थापन झाल्यावर श्यामाप्रसाद मुखोपाध्याय यांनी सावरकरांची सदिच्छा भेट घेतली होती. मात्र हिंदू महासभेची स्वतंत्र वाटचाल आजही सुरू आहे आणि शून्यातून वाटचाल करत असताना पूर्वाश्रमीच्या जनसंघाने भारतीय जनता पार्टीच्या अवतारात 3 वेळ अटलबिहारी वाजपेयी व 2 वेळ नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन केले.
डॉ. श्यामाप्रसादांविषयी लिहिताना जनसंघ स्थापनेची पार्श्‍वभूमी समजून घेणे आवश्यक होते. कलकत्यात प्रतिष्ठित मातब्बर कुटुंबात आशुतोष मुखोपाध्याय, बहुमुखी प्रतिभासंपन्न शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांचे श्यामाप्रसाद सपुत्र. दिनांक 6 जुलै 1901 मध्ये त्यांचा जन्म झाला. घरातील वातावरण संस्कारक्षम व विद्याविभूषित होते. श्यामाप्रसादही बालपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते. 1917 मध्ये मॅट्रीक व तर 1921 मध्ये गुणवत्तेसह कला स्नातक झाले आणि इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर झाल्यावर 1226 मध्ये स्वदेशात आले.
ते 33 वर्षांचे असतानाच कलकत्ता विद्यापीठाचे कुलपती झाले. त्यावेळी जगातील सर्वात तरूण उपकुलपती होते, त्यांनी बौध्द धम्माचाही अभ्यास केला होता, त्यासाठी ते श्रीलंकेतही गेले होते. प्रज्ञा व प्रतिभेचे धनी श्यामाप्रसादांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी गैरकाँग्रेसी हिंदूना एकत्रित करून कृषक प्रजापार्टीही स्थापन केली होती.
त्यावेळी देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्वलंत नेतृत्व तळपत होते. त्यांनी हिंदू महासभेत प्रवेश करून 1937 मध्ये राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवले होते. 1937 पासून 1942 पर्यंत कर्णावती (अहमदाबाद), कलकत्ता, भागलपूर व कानपूरच्या अधिवेशनात सावरकरच अध्यक्ष होते. देशभक्त श्यामाप्रसादांची 1943 व 1944 मध्ये हिंदू महासभाध्यक्ष निवड झाली. त्यांच्या नेतृत्वात अमृतसर व बिलासपूर येथे राष्ट्रीय अधिवेशने झाली. पण देशाची फाळणी, त्यात निवडणुकीत आलेले अपयश व गांधीवधोत्तर परिस्थितीत हिंदुत्ववादी राष्ट्रवादी संघटनावर संकट आले होते. सरकारचा तर रोष होता, पण लोकाधारही नव्हता.
डॉ. श्यामाप्रसाद मुखोपाध्याय मानवतावादाचे उपासक व राष्ट्रवादी होते. त्यांच्या मते धर्म, प्रांत, भाषा कोणतीही असली तरी सांस्कृतिक दृष्टीने आपण एकच आहोत ही धारणा होती. धर्माच्या आधारवर फाळणी त्यांना मान्यच नव्हती. 1946 मध्ये मुस्लीम लीगने ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’ सुरू केली. नोवाखालीचे हत्याकांड झाले व विभाजनानंतर पूर्व बंगाल, पश्‍चिम पंजाब व सिंधमधून निर्वासितांचे लोंढे येवू लागले. त्यांचे पुनर्वसन करणे व दंग्यामध्ये हिंदूंना धीर देण्याचे कार्य त्यांनी केले.
पं. नेहरूंच्या नेतृत्वात पहिले अंतरिम सरकार अस्तित्वात आले, त्यात सरदार वल्लभभाई पटेलांच्या आग्रहास्तव उद्योगमंत्री म्हणून श्यामाप्रसाद सहभागी झाले. त्यांचे चिंतन प्रखर राष्ट्रवादी होते. ते राष्ट्रीय हिताऐवजी केवळ पक्षीय दृष्टिकोन ठेवणारे नसल्याने त्यांनी मंत्री मंडळातून त्यागपत्र दिले. आक्टोबर 1951 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना झाली. अर्थातच स्वातंत्र्यवीरांना हे मान्य नव्हतेच. डॉ. मुखोपाध्याय यांना काश्मीरचा एक वेगळा ध्वज व तेथील मुख्यमंत्र्यास पंतप्रधान संबोधणे मान्य नव्हते. काश्मीरला विशेष दर्जा देणार्‍या कलम 370 ला त्यांनी लोकसभेतही प्रखर विरोध केला होता.
ऑगस्ट 1952 मध्ये त्यांनी जम्मू येथे जनसंघाचे विशाल संमेलन घेतले. मी एक तर काश्मिरींना भारतीय संविधानाच्या कक्षेत आणून राष्ट्रीय प्रवाहात घेण्याचा प्रयत्न करीन अन्यथा बलिदान देईन, अशी घोषणाच त्यांनी केली होती. 1952 मध्ये ते केंद्र सरकारचा आदेश अव्हेरून काश्मिरात निघाले त्यावेळी तेथील कथित पंतप्रधान शेख अब्दुल्ला होते. त्यांनी त्यांना स्थानबद्ध केले. 1953 मध्ये 23 जूनला श्यामाप्रसादजी मातृभूमीच्या चरणी विलीन झाले.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार