सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नायब तहसीलदार व तलाठ्यावर प्राणघातक हल्ला करणार्या प्रमुख फरार आरोपीला अटक करा यासाठी पटवारी संघटनेचे काम बंद आंदोलन

आरोपीला अटक करा यासाठी पटवारी संघटनेचे काम बंद आंदोलन

Sudarshan MH
  • Jan 28 2021 3:30PM
 उमरखेड : -  
            येथील नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांचेवर रेती माफियांनी जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा मुजोर रेती माफिया वर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हे दाखल करून सर्व आरोपींना अटक न झाल्यामुळे व फरार असलेल्या मुख्य आरोपी ला अटक करे पर्यंत तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने पुकारलेल्या काम बंद आंदोलनात विदर्भ पटवारी संघ शाखा उमरखेड सहभागी झाले आहे . उमरखेड तालुक्यात अवैध रेती उत्खनन करणारे रेती माफिया तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी तलाठी यांच्यावर सतत हल्ले करून दहशत निर्माण करीत आहे त्यांचे विरुद्ध अनेक वेळा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तरी त्यांचे विरुध्द कोणतीही ठोस कारवाई आजपर्यंत करण्यात आलेली नाही त्यामुळे रेती माफियांचे मनोबल उंचावले असून आता ते जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे नायब तहसीलदार वैभव पवार व गजानन सूरोशे यांच्यावर झालेला हल्ला या गोष्टीचा परिणाम आहे असे असतानाही संबंधित गुन्हेगार मोकाट असुन त्यांच्याविरुद्ध म . को .का. कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास पटवारी संघ काम बंद आंदोलन सुरू ठेवेल असा इशारा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना पटवारी संघातर्फे दिलेल्या निवेदनातून देण्यात आला यावेळी पटवारी संघाचे अध्यक्ष प्रकाश हापसे, उपाध्यक्ष बोईनवाड ,सचिव रायपूरकर, कोषाध्यक्ष गणेश बोडके दत्तात्रेय दुर्केवार व गजानन सुरोशे सह विदर्भ पटवारी संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
 
प्रतिनिधी किरण मुक्कावार उमरखेड जिल्हा यवतमाळ

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार