दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सहा अतिरेक्यांना अटक केली आहे. पोलीसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्या पैकी दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले असुन, अटक केलेल्या दहशतवाद्या जवळ मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिल्ली, यूपीसह महाराष्ट्रातुन या दहशतवाद्यांना अटक केली आहे.
दहशतवाद्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध..........
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सहा अतिरेक्यांना अटक केली असुन प्रसारमाध्यमांशी संपर्क साधताना दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांचा अंडरवर्ल्डशी संबध असल्याचे म्हटले आहे.
एटीएसच्या छापेमारीत आयईडी स्फोटके जप्त..
उत्तर प्रदेशातील राजकीय आखाडा तापलेला असतानाच आज प्रयागराज जिल्ह्यातील करेली भागात एटीएसने छापेमारी केली आहे. एटीएसने केलेल्या छापेमारीत मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आले असुन निवडणुकीच्या तोंडावर एटीएसने दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला आहे.