दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीमधील सराय काले खान येथील हजरत निजामुद्दीन येथे असलेली बेकायदेशीर मशीद आणि मदरसा यांना १ महिन्यामध्ये रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. हे दोन्ही पाडण्यात येणार आहेत. त्या सरकारी भूमीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या आहेत.
न्यायालयाने या दोन अतिक्रमण करून बांधलेल्या बांधकामाला पाडण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका यावेळी फेटाळून लावली. न्यायालयाने या वेळी याचिकाकर्त्याला स्पष्ट केले, की यापुढे या संदर्भात कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही; कारण ही भूमी सार्वजनिक कारणासाठी आवश्यक आहे.