सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लफडेबाज डॉन

भारताचा ‘मोस्ट वॉण्टेड’ दाऊद इब्राहिम परत चर्चेत आला. पाकिस्तानच्या ब्लॅकलिस्टमध्ये दाऊदचा समावेश होता. भारताच्या दाव्याला पुष्टी देणारी ही घटना होती. आंतरराष्ट्रीय पटलावर पाकिस्तानची नाचक्की झाल्यावर पाकिस्तानने दाऊदबाबत घुमजाव केले. दाऊद आमच्या कडेनाहीच, असा नेहमीप्रमाणे कांगावा सुरू झाला. भारतीय माध्यमांनी त्याच्या नवीन पाकिस्तानी प्रेमप्रकरणाची माहिती जगासमोर आणून प्रत्युत्तर दिले

रमेश कुलकर्णी ९९२२९०१२६२
  • Sep 4 2020 10:03AM
पाकिस्तान खरेच भिकारी राष्ट्र आहे. जागतिक आर्थिक निर्बंध टाळण्यासाठी पाकिस्तानने आतंकवाद्यांची ‘ब्लॅकलिस्ट’जाहीर केली आणि भारताचा ‘मोस्ट वॉण्टेड’ दाऊद इब्राहिम परत चर्चेत आला. पाकिस्तानच्या ब्लॅकलिस्टमध्ये दाऊदचा समावेश होता. भारताच्या दाव्याला पुष्टी देणारी ही घटना होती. आंतरराष्ट्रीय पटलावर पाकिस्तानची नाचक्की झाल्यावर पाकिस्तानने दाऊदबाबत घुमजाव केले. दाऊद आमच्या कडेनाहीच, असा नेहमीप्रमाणे कांगावा सुरू झाला. भारतीय माध्यमांनी त्याच्या नवीन पाकिस्तानी प्रेमप्रकरणाची माहिती जगासमोर आणून प्रत्युत्तर दिले आणि इथूनच दाऊदच्या अफेअरच्या चर्चांनी जोर पकडला. ‘सुन साहिबा सुन...’ म्हणत मंदाकिनीची धमाकेदार फिल्मी एण्ट्री झाली़ तिने धबधब्याखाली केलेली आंघोळ प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली. बोल्ड सीन देत दणदणीत आगमन करणाºया मंदाकिनीचे फिल्मी करिअर दाऊदसोबत नाव जोडले गेल्यामुळे शेवटी संपुष्टात आले. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील अँग्लो इंडियन परिवारातील यास्मिन जोसेफ उर्फमंदाकिनी हिच्या सौंदर्याने फिल्मी दुनियेला भुरळ पाडली होती. शोमॅन राजकपूर यांच्या नजरेस पडलेल्या या निळ्या डोळ्याच्या मंदाकिनीला रातोरात स्टार बनविले. अंडरवर्ल्डचा फिल्मी दुनियेत हस्तक्षेप वाढण्याचा तो काळ होता. अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम याची दहशत व भीती फिल्मी दुनियेवर जाणवत होती. दाऊद इब्राहिमसोबत आपली जवळीक आहे हे दाखविण्याचा फिल्मी सितारे प्रयत्न करीत राहायचे. दाऊद फिल्मी सिताºयांचा ‘भाईजान’ झाला होता. प्रत्येकाला आपल्या भाईजानचा हात डोक्यावर हवा असायचा. त्याकरिता ते काहीही करायला तयार असत. मुंबई बॉम्बस्फोटानंतर चित्र बदलले. दाऊदची क्रेझ कमी झाली. दाऊद या सर्व फिल्मी कलाकारांना परका वाटायला लागला; परंतु छुपे संबंध कायम राहिले. दाऊद या सर्व नामवंत फिल्मी कलाकारांना दुबई येथे शोसाठी आमंत्रित करायचा. त्यात त्यांना बक्कळ पैसे मिळायचे व भाईजानचा वरदहस्त डोक्यावर कायम राहील, या भीतीमिश्रित अपेक्षेपोटी हे सर्व नामवंत कलाकार तिथे हजेरी लावायचे. तेथेच यास्मिन जोसेफ उर्फ मंदाकिनी हिची दाऊदसोबत ओळख झाली. दाऊदला मंदाकिनी खूप आवडायची, असे म्हटले जाते. हिंदी चित्रपट निर्मात्यांकडे मंदाकिनीला रोल मिळावा, अशी दाऊदची आग्रही शिफारस असायची. त्यामुळे मंदाकिनी ही ‘दाऊद गर्ल’ असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगायला लागली होती. त्यात भर पडली दुबई येथील क्रिकेट स्टेडियममधील दाऊद व मंदाकिनीच्या एकत्रित फोटोची. १९९५ मधील या एका एकत्रित फोटोने मंदाकिनीचे संपूर्ण आयुष्यच नासवून टाकले. मंदाकिनीचे नाव दाऊद इब्राहिमसोबत जोडण्यासाठी या फोटोला पुरावा म्हणून वापरण्यात आले. मंदाकिनीने दाऊदशी लग्न केले व त्यांना एक मुलगा आहे, अशा बातम्या बाहेर यायला लागल्या. बातमीची सत्यता सांगण्यासाठी मंदाकिनी मात्र गायब होती. त्यामुळे दाऊद व मंदाकिनी यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा अधिकच रंगली. अशा गॉसिपमुळे आघाडीच्या या बिनधास्त नायिकेला आपल्या फिल्मी करिअरवर पाणी सोडावे लागले हे मात्र खरे आहे. पुढच्या काळात मंदाकिनीचा अज्ञातवास संपला. मंदाकिनी अचानक समोर आली व तिने स्वत:च दाऊद इब्राहिमसोबत असलेल्या संबंधाचा इन्कार केला. त्या फोटो काढणाºया फोटोग्राफरने आयुष्य कसे उद्ध्वस्त केले याची करुणकथा सांगितली. दाऊदच्या संबंधाची बातमी कशी खोटी होती, याचा तपशीलवार उलगडा तिने केला. आपले लग्न १९९० मध्येच डॉक्टर क्यूगर रिंचपोचे या तिबेटियन भिक्षूसोबत झाल्याचे पुरावे दिले. साठच्या दशकात मर्फी रेडिओच्या जाहिरातीमध्ये एका निरागस मुलाचा चेहरा झळकायचा. हाच निरागस मुलगा म्हणजे डॉक्टर क्यूगर रिंचपोचे़ याच ‘मर्फीबॉय’ डॉक्टरसोबत मंदाकिनीचे लग्न झाले. आता तिला मुलगा रॉबील व मुलगी रब्ब्जे, अशी दोन मुले आहेत. सुखाचा संसार सुरू आहे; परंतु अजूनही ‘दाऊदची गर्लफ्रेंड’ हे मानगुटीवर बसलेले भूत पूर्णपणे उतरले नाही हे मात्र वास्तव आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये आता बºयापैकी स्थिरावला होता. पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याने बस्तान बसविले होते. पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीसाठी मुक्तहस्ते पैशांची उधळण करीत होता. त्यामुळे पाकिस्तानी फिल्मी इंडस्ट्री दाऊदने खिशात घातली. दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानी कलाकारांच्या आकर्षणाचे केंद्र बनला. अनिता अय्युब ही पाकिस्तानी सेक्सी बोल्ड गर्ल अशीच या आकर्षणाला बळी पडली. पाकिस्तानी मॉडेल कम फिल्मी हीरोईन अनिता अय्युबसोबत दाऊदचे नाव जोडले गेले. तिला आपल्या फिल्ममध्ये नाकारणाºया जावेद सिद्दीकी या निर्मात्याची दाऊदने गोळी मारून हत्या केल्याचे बोलले जाते. दाऊद तिच्याबाबत खूप आग्रही असायचा. अनिता अय्युब व दाऊद इब्राहिम यांच्या संबंधांची चर्चा खूप वर्षे होत राहिली; परंतु नंतरच्या काळात अनिता अय्युब ही पाकिस्तानी हीरोईनच गायब झाली. दाऊदचे या गर्लफ्रेंडसोबतचे इश्क मात्र खूप काळ लक्षात राहिले. दाऊदची ओरिजनल बेगम मेहजबीन हिचा या प्रकरणातील हस्तक्षेपही त्या काळी खूप गाजला होता. दाऊद आता ६५ वर्षांचा झाला असावा; परंतु त्याच्या आयुष्यात आता नवीन आयटम आली आहे. त्याच्यापेक्षा २७ वर्षांनी लहान असलेली पाकिस्तानी सिंगर कम आयटम गर्ल मेहविश हयात ही त्याच्या जीवनात आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. कमजोर दिलवाल्या दाऊदला तिच्याशी ‘प्यार’ झाल्याच्या बातम्या झळकू लागल्या. पाकिस्तानी बोल्ड अदाकारा मेहविश हयात हिच्यासोबतचे दाऊदचे संबंध समोर आले. मेहविश हयात ही पाकिस्तानची सिंगर कम बोल्ड आयटम गर्ल म्हणून लोकप्रिय आहे. एका कार्यक्रमात दाऊदची नजर तिच्यावर पडली आणि दाऊद इब्राहिम तिच्या प्रेमात पडला. पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले वजन वापरून त्याने मेहविश हयातसाठी मोठे फिल्मी प्रोजेक्ट मिळवून दिले. दाऊद तिच्यासाठी वेडा झाल्याचे बोलले जाते. आपले राजकीय वजन वापरत दाऊद इब्राहिमने २०१९ मध्ये पाकिस्तानचा मानाचा पुरस्कार ‘तमघा इ- इम्तियाज’ मेहविश हयातला मिळवून दिला आणि वादाला सुरुवात झाली. पाकिस्तानच्या सुज्ञ नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला. मेहविश हयात हिचे योगदान काय आहे? असा प्रश्न विचारल्या जाऊ लागला. पुरस्कार कसा मिळाला? या महाचर्चेतून मेहविश हयात व दाऊदचे संबंध चव्हाट्यावर आले. ही अनोखी ‘लव्हस्टोरी’ पाकिस्तानची राष्ट्रीय बातमी बनली आणि दाऊद इब्राहिमची चिडचिड वाढायला लागली. या आंतरराष्ट्रीय माफियासोबत आपले कुठलेच संबंध नाही. हा भारतीय मीडियाने तयार केलेला आपल्या बदनामीचा बनाव व अजेंडा आहे, असा खुलासा करीत मेहविश हयात हिने सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्याला संबंध जोडायचे असतील, तर आपण हॉलिवूड स्टार लिओनार्डो डीकॅप्रिओसोबत जोडू, अशी वादग्रस्त टिवटिव केली. दशकभर पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वाटचाल करणाºया या वादग्रस्त अदाकारा मेहविश हयात हिच्या दाऊद इब्राहिमसोबतच्या मधुर संबंधांची चर्चा मात्र अजूनही जोरात आहे. आंतरराष्ट्रीय माफिया दाऊद इब्राहिम हा कमालीचा लफडेबाज असणार, यात काहीही शंका नाही. आतंकवादी दाऊदचे असे ‘प्यारवाली लव्हस्टोरी’चे संबंध नवीन नाहीत. फिल्मी हिरोईनविषयीचे त्याला जबरदस्त आकर्षण आहे. फिल्मी हीरोईन त्याचा ‘वीक पॉइंट’ असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले. फिल्मी हीरोईनसुद्धा ‘प्रीतिपोटी’ नव्हे तर ‘भीतिपोटी’ या कुख्यात माफियाला शरण जात असाव्यात. अनेक मोठी फिल्मी नावे यामध्ये गुंतलेली असण्याचा अंदाज आहे. जेथे सर्व अनैतिकच धंदे चालतात तेथे नैतिकतेला थारा असण्याचे काहीच कारण नाही. आयुष्यभर खूनखराबा, लूटमार, फसवणूक व दहशतवादी देशद्रोही कृत्ये करणाºया दाऊदच्या लेखी प्रेम, इश्क, प्यार या शब्दांना कवडीमोल किंमत असावी. वासनेलाच ‘प्यार’ समजणारी त्याची अक्कल आहे. पैशाच्या आमिषापोटी त्याच्या सोबत गेलेल्या सर्वच ग्लॅमरस हीरोईनचे आयुष्यच उद्ध्वस्त झाल्याचे समोर येते. त्याची मोठी सामाजिक किंमत त्यांना चुकवावी लागली आहे. शेवटी बदनामीचे आयुष्य वाट्याला आले ते वेगळेच. दाऊद इब्राहिम हा स्वत:च पळपुटा डॉन आहे. तो कुणाच्याच आयुष्याला स्थिरता देऊ शकत नाही. त्याच्यासोबतच्या संबंधाने आयुष्य आबाद होण्याचे कुठलेच कारण नाही, ते बरबादच होणार, याची जाण व एवढे भान दर्शविणारा हा स्पष्ट संदेश आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार