सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यव्यापी आराधी-गोंधळी-वाघ्या-शाहिर-भजनी परिषदेची वतीने श्री क्षेत्र तुळजापूर पर्यंत दंडवत यात्रा

पुन्हा एकदा लोककलावंतांच्या न्याय मागण्यासाठी जागरआराधी-गोंधळी- वाघे-शाहिर भजनी परिषदेच्या वतीने पुन्हा एखदा २५ वर्षानंतर महाराष्ट्रात पारंपारीक लोककलावंतांच्या न्याय मागण्यांसाठी दंडवत यात्रा काढून जनजागरणास प्रारंभ केला आहे, असे प्रतिपादन परिषदेचे प्रांताध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी नणंद येथे दंडवत यात्रेत सहभागी असणाऱ्या सर्वांचा सहृदय सत्कार भवानी माता मंदीरात आयोजित ऋणनिर्देश सत्कार समारंभात केले.यावेळी भाजपा जेष्ठ नेते व्यंकटराव पनाळे, राजेंद्र वनारसे, ह.भ.प. भास्कर महाराज रामेश्वरकर यांच्या हस्ते पुष्पाताई म्हेत्रे, तात्यासाहेब देशमुख, सुभाषराव जाधव आणि दंडवत यात्रेत सहभागी असणाऱ्या सर्वांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नणंदचे माजी सरपंच माधवराव पाटील, माजी सरपंच शशिकलाबाई विरगावे, माजी चेअरमन नामदेव मारूती म्हेत्रे, बळीराम तोपन्ना, विक्रम श्रीमंत पाटील, सरपंच हरिदास बोळे, ग्रामसेवक धनंजय कोसले, रूक्मीणबाई अराधीन, राजाराम कुंभार, लक्ष्मण कांबळे, तात्यासाहेब तेलंग, सनिताताई माळी, केसरबाई माळी, परशुराम जाधव, दत्ता मिरगळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन पाणी फाऊंडेशनचे अमित तानाजी पाटील यांनी केले.

s.ranjankar
  • Aug 5 2021 4:56PM
निलंगा : आराधी-गोंधळी- वाघे-शाहिर भजनी परिषदेच्या वतीने पुन्हा एखदा २५ वर्षानंतर महाराष्ट्रात पारंपारीक लोककलावंतांच्या न्याय मागण्यांसाठी दंडवत यात्रा काढून जनजागरणास प्रारंभ केला आहे, असे प्रतिपादन परिषदेचे प्रांताध्यक्ष राजेंद्र वनारसे यांनी नणंद येथे दंडवत यात्रेत सहभागी असणाऱ्या सर्वांचा सहृदय सत्कार भवानी माता मंदीरात आयोजित ऋणनिर्देश सत्कार समारंभात केले.
यावेळी भाजपा जेष्ठ नेते व्यंकटराव पनाळे, राजेंद्र वनारसे, ह.भ.प. भास्कर महाराज रामेश्वरकर यांच्या हस्ते पुष्पाताई म्हेत्रे, तात्यासाहेब देशमुख, सुभाषराव जाधव आणि दंडवत यात्रेत सहभागी असणाऱ्या सर्वांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नणंदचे माजी सरपंच माधवराव पाटील, माजी सरपंच शशिकलाबाई विरगावे, माजी चेअरमन नामदेव मारूती म्हेत्रे, बळीराम तोपन्ना, विक्रम श्रीमंत पाटील, सरपंच हरिदास बोळे, ग्रामसेवक धनंजय कोसले, रूक्मीणबाई अराधीन, राजाराम कुंभार, लक्ष्मण कांबळे, तात्यासाहेब तेलंग, सनिताताई माळी, केसरबाई माळी, परशुराम जाधव, दत्ता मिरगळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन पाणी फाऊंडेशनचे अमित तानाजी पाटील यांनी केले.
यावेळी श्री वनारसे म्हणाले की, १९९७ पासून राज्यव्यापी आराधी-गोंधळी-वाघ्या-शाहिर-भजनी परिषदेच्या माध्यमातून पारंपारीक लोककावंतांना मबई पर्यंत मानधन मिळविण्याकरीता अर्ज पाठवन चकरा माराव्या लागत होत्या त्या बंद करून मानधन वाटप करण्याकरीता जिल्ह्याला कार्यालय असावे अशी मागणी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जिल्हा परिषद, समाजकल्याण विभाग अंतर्गत जिल्हा कमिट्या निर्माण झाल्या. या यशस्वी वाटचालीने कार्य करणाऱ्या संघटनेने त्यावेळी पारंपारीक लोककलासंवर्धन व संशोधन केंद्र प्रत्येक जिल्ह्यात निर्माण करावी अशी मागणी केली होती. त्या मागणीची पुर्तता अद्यापपर्यंत झालेली नाही अशी खंतही श्री वनारसे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. पारंपरिक लोक कलावंताना वयाची अट रद्द करून ज्यांनी ज्यांनी म्हणून जिल्हा परिषदेकडे मानधन लोककलावंत मानधन मिळविण्यासाठी अर्ज केला आहे त्या सर्वांना सरसकट दरमहा ५ हजार रूपये मानधन मिळावे या न्याय मागणीसाठी आजपासून राज्यव्यापी आराधी-गोंधळीवाघ्या-शाहिर भजनी परिषद राज्यभर विविध संघटना, संस्था, मंडळे, कलापथके यांना सोबत घेऊन जनजागर अभियान मागण्याची पुर्तता होईपर्यंत करणार असा इशाराही यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा यांना दिला आहे. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, वृद्धलोककलावंतांना मानधन देण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत जी कमिटी आहे त्यांना दरवर्षी फक्त शंभरच नविन लोकांना मानधन योजना मंजूर करण्याचे अधिकार आहेत त्यामुळे कमिटीवर असणारे ज्यांनी ज्यांनी अर्ज केला त्यांना ते मानधन योजनेचा लाभ देऊ शकत नाहीत. याची जाणीव करून देण्यासाठी गेली अनेक वर्ष शासन दरबारी आम्ही प्रयत्न करीत आहोत. परंतू झोपेचे सोंग घेतलेले विविध राजकीय पक्षातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या लोकांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. याचे परिणाम त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगर पालिका आणि नगर पालिका निवडणकीत भोगावे लागणार आहेत. वेळीच जागे होऊन राज्याचे मख्यमंत्री मा.ना. उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना. अमित विलासरावजी देशमुख यांना या मागण्याच्या पुर्ततेसाठी अग्रह धरावा असे कळकळीचे नम्र आवाहन विनंती रूपाने निवेदनाद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यात देणार येणार आहेत.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते व्यंकटराव पन्हाळे, राज्यव्यापी आराधी-गोंधळी-वाघ्या-शाहिर भजनी परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प. भास्कर चव्हाण महाराज रामेश्वरकर, माजी सरपंच विक्रांत पाटील, माजी सरपंच सौ. म्हेत्रे, पाणी फाउंडेशनचे अनमोल पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दंडवत यात्रेकरूंचा सहृदय सत्कार करण्यात आला. यावेळी निलंगा, औसा, उमरगा, तालुक्यातील अनेक पारंपारीक लोककावंतातील कलापथक प्रमुख उपस्थित होते.
 
 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार