(योगेश शर्मा)
बुलढाणा : दहशत पसरविण्याच्या उद्देशाने चिखली येथे विनापरवाना भल्यामोठया तलवारी घरात लपवून ठेवणा-या चौघांना चिखली येथे बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई 17 नोव्हेंबरच्या रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या गोपनिय माहितीनुसा स्थानिक गुन्हे शाखेने नितीन साहेबराव सुरुशे वय 32 रा. हेडगेवार रुगणालयाजवळ , प्रभाग 8 चिखली , जितेश सदाशिव नकवाल , वय 23 रा. वाल्मीकीनगर , श्रीराममंदिरासमोर, सुनिल संतोष हिवाळे , वय 29 रा. दिनदयालनगर, प्रविण रामभाऊ कोल्हे रा. सदानंदनगर यांच्या घरावर छापा मारला असता प्रत्येकाकडे एक याप्रमाणे चार तलवारी किंमत 7600 मिळूनआल्या आहेत. याच्याविरध्दं चिखली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास चिखली पोलीस करीत आहेत.
वरील कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया , अप्पर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत , अप्पंर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे यांच्य मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांच्या आदेशाने निलेश शेळके, गजानन आहेर , विजय सोनाने ,भारत जंगले, विजय वारुळे, , राहुल बोर्डे , अनुराधा उबरहंडे यांनी पार पाडली.