सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आनंदवार्ता १० राज्यांमध्ये वाढला कोरोनामुक्तीचा वेग !

१० राज्यांमध्ये वाढला कोरोनामुक्तीचा वेग ! एकूण कोरोनामुक्तांपैकी ७२% रुग्ण गेल्या एका दिवसात बरे झाले असल्याचे वृत्त.

Snehal Joshi .
  • Oct 2 2020 11:20PM
देशातील कोरोनामुक्त रुग्णसंख्येत गेल्या महिन्याभरात कमालीची वाढ झाली आहे. देशाचा कोरोनामुक्तीदर त्यामुळे ८४% घरात पोहचला आहे. गेल्या ११ दिवसांमध्ये कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात सरकारला यश मिळाले असल्याचा दावा त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. गेल्या एका दिवसात १० राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७२% कोरोनामुक्तांची नोंद घेण्यात आली. या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गुरुवारी १६ हजार १०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. महाराष्ट्रापाठोपाठ आंधप्रदेश (७,२९७), कर्नाटक (७,१४४), तामिळनाडू (५,५१६), उत्तर प्रदेश (४,४४४), ओडिशा (४,३८०), दिल्ली (३,१६७), पश्चिम बंगाल (२,९९६), छत्तीसगढ (२,९८१) तसेच केरळमध्ये (२,८२८) सर्वाधिक रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. देशातील सक्रिय रुग्ण संख्या १० लाखांहून कमी ठेवण्यात सरकारला यश मिळाले आहे. शुक्रवारी सक्रिय रुग्णसंख्येत केवळ १ हजार ५१२ ची वाढ नोंदवण्यात आली. गेल्या १२ दिवसात १० लाख रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ७६.६२% रुग्ण हे केवळ १० राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत. सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात (२,५०,४४०) आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक (१,१०,४३१), केरळ (७२,४१८), आंधप्रदेश (५७,८५८), उत्तर प्रदेश (५०,३७८), तामिळनाडू (४६,३६९), आसाम (३४,१६३), ओडिशा (३१,७९५), छत्तीसगढ (३०,४६८) तसेच तेलंगणात (२८,६२०) सर्वाधिक सक्रिय कोरोनाबाधित आहेत. १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून ५,००० पेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेल्याचे दिसून आले आहेत . गेल्या एका दिवसात देशातील १,०९५ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील ८३.३७% रूग्ण १० राज्ये, केंद्रशासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रामध्ये ३९४ कोरोनाबाधितांचा मृत्यू (३६%) झाला. तर, कर्नाटकात १४० रुग्णांचा मृत्यू झाला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार