सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार-मृत्यूनंतर उघड होतायेत पोजीटीव्ह अहवाल

नंदुरबार जिल्ह्यात मृत्यूनंतर कोरोना पोजीटीव्ह आल्याची तिसरी घटना

Sudarshan MH
  • Jul 8 2020 1:58PM


नंदुरबार (व्रुत्तसेवा)- स्वॅब तपासणी अहवाल मिळण्यात उशीर होत असल्याने काहीप्रसंगी तर थेट रुग्णाच्या मृत्यूनंतरच तो पॉझिटिव्ह असल्याचे उघड होत आहे. परिणामी रुग्णाच्या संपर्कातील लोकांना तोपर्यंत संसर्ग होत राहण्याचा प्रकार घडू लागला असून स्थिती धोकादायक बनू पहात आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत 2151 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. पैकी आजपर्यंत त्यातील एकूण 190 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आजच्या घडीला 100 जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. अहवाल प्रलंबित राहिल्याने काय घडते त्याचे उदाहरण नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्यांदा पाहायला मिळाले. तोरखेडा येथील 78 वर्ष वयाच्या संशयिताचा स्वॅब घेतल्यानंतर 1 जुलै रोजी मृत्यू झाला. परंतु त्यांचा अहवाल 5 जुलै रोजी रात्री पॉझिटिव्ह आला. तोपर्यंत त्यांच्या संपर्कात येऊन गेलेले अंधारातच राहिले. मागील महिन्यात सुद्धा नंदुरबार जिल्ह्यातील एका कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल त्याच्या मृत्यूनंतरच ऊघड झाला होता. दरम्यान बागवान गल्लीतील रुग्णाचाही असाच प्रकार घडला. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार नंदुरबार येथील या रुग्णाचा 4 जुलै रोजी मृत्यू झाला. प्रत्यक्षात सदर रुग्ण 2 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा अहवाल मात्र काल 7 जुलैच्या रात्री पॉझिटिव्ह आला. 

दरम्यान, नंदुरबार शहरातील अवघ्या 2 वर्षाच्या मुलालाही कोरोना आढळला. सहारा टाऊन हाँल येथील हा मुलगा आहे. 7 जुलै रात्री 93 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. पैकी 21 पॉझिटीव्ह असून जिल्हा शासकीय रुग्णालयातील 3 कर्मचाऱ्यांचा तसेच लहान शहादा प्राथमिक आरोग्य केंद्रातील - 48 वर्षीय कर्मचाऱ्याचा यात समावेश आहे. बागवान गल्ली नंदुरबार-45 वर्षीय पुरुष, गांधीनगर नंदुरबार-78 वर्षीय पुरुष, चौधरी गल्ली नंदुरबार-41 वर्षीय महिला, नागाई नगर नंदुरबार-47 वर्षीय पुरुष, देसाईपुरा नंदुरबार-45 आणि 30 वर्षीय पुरुष, भट गल्ली नंदुरबार-38 वर्षीय पुरुष, आशिर्वाद कॉलनी नंदुरबार-31वर्षीय पुरुष, धर्मराज  नगर नंदुरबार-44 वर्षीय पुरुष, तालुका वैद्यकीय कार्यालय नंदुरबार-32 वर्षीय पुरुष, ज्ञानदीप सोसा.नंदुरबार-37 वर्षीय महिला, हुडको कॉलनी नंदुरबार-45 वर्षीय पुरुष, सहारा टाऊन येथे एकाच परिवारातील 3 व्यक्ती, मोहिदा ता. शहादा-38 वर्षीय पुरुष.जनता पार्क नवापूर- 33 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार