सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जमावाकडून होणार्‍या हत्यांना धर्माशी जोडू नका – सर्वोच्च न्यायालय

कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा याचिकेत उल्लेख नसल्याने न्यायालयाने मुसलमान अधिवक्त्याला सुनावले.

Shruti Patil
  • Apr 18 2024 8:47AM

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने जमावाकडून होणार्‍या अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींच्या हत्येच्या प्रकरणावर दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करतांना अधिवक्ता सलीम पाशा यांना फटकारले. या याचिकेत उदयपूर येथील कपडे शिकवणारे कन्हैयालाल यांच्या हत्येचा उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यावरून न्यायालयाने सलीम पाशा यांना फटकारतांना ‘अशा प्रकरणांमध्ये निवडक होऊ नका; कारण हे प्रकरण सर्व राज्यांशी संबंधित आहे. धर्माच्या आधारे अशा घटनांकडे पाहू नका’ असे म्हटले आहे.

‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन’ या संस्थेकडून गेल्या वर्षी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. जमावाकडून हत्या झालेल्यांच्या कुटुंबियांना हानी भरपाई देण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

न्यायालयाने जमावाकडून हत्यांच्या प्रकरणांमध्ये केलेल्या कारवाईवर ६ आठवड्यांच्या आत अनेक राज्यांकडून उत्तर मागवले आहे. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार