सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदू धर्मियांच्या कर्मकांडाची व्यवस्था करण्यासाठी वेळोवेळी निवेदन देऊन देखील चालढकल पना करणाऱ्या नगरपालिकेला आंदोलनाचा इशारा

नवापूर नगर परिषद हद्दीतील जुने महादेव मंदिर , रंगावली नदी किनारी दशक्रिया विधीसाठी घाट बांधणे व मंदिर परिसर सुशोभित करणेकामी ठोस

Sudarshan MH
  • Jul 6 2021 6:31PM


नवापूर नगर परिषद हद्दीतील जुने महादेव मंदिर , रंगावली नदी किनारी दशक्रिया विधीसाठी घाट बांधणे व मंदिर परिसर सुशोभित करणेकामी ठोस उपाययोजना न केल्यास आगामी १५ ऑगस्ट २०२१ रोजी शासकीय ध्वजवंदनाच्या ठिकाणी पोलीस स्टेशन आवार , नवापूर येथे निष्क्रिय नवापूर नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नगराध्यक्ष व नगरसेवकांना जाग येण्यासाठी श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समिती . नवापूर च्या वतीने मुख्याधिकारी  नवापूर नगर परिषद , यांना एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करणेबाबत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की संदर्भ  पत्र क्र .०५ दिनांक १०.०३.२०२१ अर्जदार : - जुने महादेव मंदिर परिसरातील नागरिक तसेच नवापूर शहरातील तमाम नागरिक यांच्या वतीने उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आम्ही खालील सह्या करणारे नवापूर नगर परिषद हद्दीतील जुने महादेव मंदिर परिसरातील व नवापूर शहरातील नागरिक  या पत्राद्वारे विनंती करीतो की , जुने महादेव मंदिर गल्ली येथे रंगावली नदीलगत श्री . जागनाथ महादेव मंदिर असून ते तमाम हिंदु बांधवांचे आराध्य दैवत आहे . या मंदिराचे परिसरात शहरातील सर्व हिंदू बांधव त्यांच्या परिवारात निधन झालेल्या व्यक्तीच्या दशक्रिया विधी याठिकाणी करीत असतात तसेच इतर धार्मिक कार्यक्रम देखील या ठिकाणी होत असतात . या विधी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा आहेला , मात्र दशक्रिया विधीसाठी मंदिराच्या मागील बाजुस सर्व मृत व्यक्तीच्या सुतकी नातेवाईकांची केशार्पण केले जाते व ते केसं हवेच्या झोक्याने उडून मंदिर तथा इतर परिसरात जातात . तसेचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम देखील याच मंदिराच्या आतील भागात घेतला जातो . मात्र यामुळो मंदिराचे पावित्र्य राखले जात नाही .
तरी महोदयांना आम्ही निवेदन करीतो की , इतर ठिकाणी ज्याप्रमाणे दशक्रिया विधीसाठी नध्यानवर घाट बांधले आहेत त्याचप्रमाणे आपल्या नवापूर शहरातील रंगावली नदीच्या जवळ देखीत घाट बांधण्यात यावा . तसेच दशक्रिया विधीच्या पुजेसाठी प्रशस्त असा हॉल बांधण्यात याला ज्यात २०० ते ३०० लोक बसून पुजाविधी करु शकतील , केश कर्तनासाठी वेगळी जागा निश्चित करुन त्याठिकाणी केश कर्तनकामी बसण्यासाठी ओटे बनवून द्यावे व कापलेल्या केसांसाठी डस्टबीन लावून द्यावे . जेणेकरुन नगर परिषदेचे कर्मचारी रोजच्या रोज कापलेले केस घेऊन जातील व त्यामुळे केस दानानंतर केस उडून जाणार नाहीत व मंदिराचे देखील पावित्र्य राखण्यास मदत होईल . याठिकाणी असलेल्या मंदिर परिसरात वॉल कंपाऊंड करुन सुशोभित करण्यात यावे . याकरीता उपरोक्त संदर्भीय पत्र देऊन चार महिन्यांचा कालावधी होत असून याबाबत विनंती करण्यात आलेली होती परंतु , याबाबत आजतागायक कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास येत आहे . करीता आगामी १५ ऑगस्ट २०२१ रोजी शासकीय ध्वजवंदनाच्या ठिकाणी पोलीस स्टेशन आवार , नवापूर येथे निष्क्रिय नवापूर नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नगराध्यक्ष व नगरसेवकांना जाग येण्यासाठी एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे . तरी कृपया याची नोंद घेऊन कार्यवाही करावी . यामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील . प्रत रवाना : ०१ . मा . तहसिलदार सो . , नवापूर ता.नवापूर जि.नंदुरबार ०२. मा . पोलीस निरीक्षक सो . , नवापूर पोलीस स्टेशन , नवापूर जि.नंदुरबार मा . नगराध्यक्षा सोा . , नवापूर ता.नवापूर जि.नंदुरबार यांना निवेदन देण्यात आलेले आहे
निवेदनावर खालील प्रमाणे सह्या आहेत गणेश भानुदास वडनेरे राजेश सोमनाथ सोनी  शंकर जगदीश दर्जी अजित यशवंत पाथरकर निलेश बाबुभाई देसाई किरण टिभे संजय सुरेश सोनी प्रशांत ठाकरे गोविंद राजाराम मोरे श्याम नारायण गावीत राजेश जगन गोसावी निलेश जयंतीलाल प्रजापत डॉ.अमित शिवाजी मावची आनंदराव ध्रुव वाघ महेंद्र नेरकर घनश्याम मगनलाल परमार प्रा.कमलेश पाटील जिग्नेश पंचाल अँड.वृतुल भानुदास कुलकर्णी अशोक भरवाड संजय पोपटराव सोनवणे  योगेश सोनार कुणाल दुसाणे  जगदिश जयस्वाल मुकेश चावला सुनिल छोटू पवार अॅड , मोहित शर्मा संदिप पाटील मयुर लक्ष्मण टिभे मनोज बोरसे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार