सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पेट्रोल-डीझेल-गॅस दरवाढी विरोधात लातुरात कॉंग्रेसचे आंदोलन, सायकल रैली काढून केंद्र सरकार विरोधात नोंदवला निषेध.

शहर जिल्हा काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. १० जुलै रोजी शहरातून सायकल रॅली काढत पेट्रोल-डीझेल इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला, तसेच वाढती पेट्रोल-डीझेल व इंधन दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली. मागील काही दिवसापासून देशभरात पेट्रोल-डीझेल इंधन दरवाढ काही केल्या कमी होत नाही दिवसेदिवस वाढत्या इंधन दरवाढी मुळे जनता त्रस्त असून यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या महागाईने उच्चांक गाठला आहे. परिणामी देशातील जनतेला दैनंदिन जीवनात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र तरीही केंद्र सरकार वाढत्या पेट्रोल-डीझेल इंधन दरवाढीवर गंभीर नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या वाढत्या पेट्रोल-डीझेल इंधन दरवाढी विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आवाहनानंतर राज्यभरात केंद्र सरकार विरोधात आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.

s.ranjankar
  • Jul 11 2021 12:36PM
 
 
लातूर: शहर जिल्हा काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. १० जुलै रोजी शहरातून सायकल रॅली काढत पेट्रोल-डीझेल इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला, तसेच वाढती पेट्रोल-डीझेल व इंधन दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली. मागील काही दिवसापासून देशभरात पेट्रोल-डीझेल इंधन दरवाढ काही केल्या कमी होत नाही दिवसेदिवस वाढत्या इंधन दरवाढी मुळे जनता त्रस्त असून यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या महागाईने उच्चांक गाठला आहे. परिणामी देशातील जनतेला दैनंदिन जीवनात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र तरीही केंद्र सरकार वाढत्या पेट्रोल-डीझेल इंधन दरवाढीवर गंभीर नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या वाढत्या पेट्रोल-डीझेल इंधन दरवाढी विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आवाहनानंतर राज्यभरात केंद्र सरकार विरोधात आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. 
लातूर शहर जिल्हा काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहरातील साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून पेट्रोल डीझेल इंधन दरवाढी विरोधात शहरातून सायकल रेली काढण्यात आली. दरम्यान गंजगोलाई येथे जगदंबा माता पूजन करून नरेद्र मोदी सरकारला इंधन दरवाढ मागे घेण्याची सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करण्यात आली. तसेच यावेळी आराधी गोंधळ घालून अनोखे आंदोलन देखील करण्यात आले. महात्मा गांधी चौक मार्गे निघालेल्या रॅलीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला. या प्रसंगी बोलताना लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती यु.पी.ए.सरकारच्या काळापेक्षा कमी असतानाही देशात पेट्रोल डीझेलचे भाव सर्वोच्च पातळीवर गेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे या दरवाढीमुळे जगणे कठीण झाले असून इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल असे ते म्हणाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात लातूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी वाढलेल्या खाद्य तेलाच्या भावामुळे गोरगरीब जनतेसोबतच मध्यमवर्गीय लोकांच्याही स्वयंपाकात मिठाचा खडा पडल्यासारखे सध्या झाले आहे. यु.पी.ए. सरकारच्या काळातील घरगुती सिलेंडर ३५० रुपयावरून आता ९०० रुपयावर जाऊन पोहचले ,पेट्रोल १०७ रुपये तर डीझेल शंभरी जवळ आले ज्यामुळे जनता मेटाकुटीला आली आहे तरीही केंद्र सरकार यावर गंभीर नाही असे म्हणत केंद्र सरकारने पेट्रोल-डीझेल इंधन दरवाढ तसेच घरगुती सिलेंडरच्या किमती तात्काळ कमी कराव्यात अन्यथा येत्या काळात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधातील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी लातूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव मनपा गटनेते ॲड. दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, सुभाष घोडके, प्रवीण पाटील, ॲड. फारूक शेख, विजयकुमार साबदे, कैलास कांबळे, मोहन सुरवसे, महेश काळे, सचिन दाताळ, ॲड. देवीदास बारूळे पाटील, प्रविण सुर्यवंशी, प्रदिपसिंह गगणे, युनुस मोमीन, एकनाथ पाटील, रघुनाथ मदने, आयुब मणियार, सिंकदर पटेल, प्रविण कांबळे, नागसेन कामेगावकर, एम.पी.देशमुख, पुनीत पाटील, सुमीत खंडागळे, अमित जाधव, ज्ञानेश्वर सागावे, सुपर्ण जगताप, रमेश सुर्यवंशी, सुंदर पाटील कव्हेकर, तबरेज तांबोळी, जमालोददील मणियार, सुरेश चव्हाण, अभिजीत इगे, अकबर माडगे, युनुस शेख, करीम तांबोळी, अभिषेक पतंगे, विजय
टाकेकर, व्यकटेश पूरी, प्रमोद जोशी, रघुनाथ शिंदे, राजू गवळी, राज क्षिरसागर, अजित चिखलीकर, धनंजय शेळके, अबू मणियार, दिनेश गोजमगुंडे, समाधान गायकवाड, काशिनाथ वाघमारे, युसुफ बाटलीवाला, जय डगे, मैनोददीन शेख आदी उपस्थित होते.
 
 
 
 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार