सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मालिकांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही -- नाना पटोले

भाजपच्यावतीनं विधिमंडळाबाहेर आणि सभागृहात आक्रमक आंदोलन केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या मागणीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Snehal Joshi .
  • Mar 4 2022 8:49PM

काल महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत आहेत . त्यामुळं त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजप आक्रमक झाला आहे.

भाजपच्यावतीनं विधिमंडळाबाहेर आणि सभागृहात आक्रमक आंदोलन केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या मागणीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांच्या प्रकरणात सध्या आरोप आहेत. नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, याच्याशी आम्ही सहमत आहोत, असं नाना पटोले म्हणाले.

याशिवाय इकबाल मिर्चीकडून भाजपला डोनेशन मिळाल असून भाजप पक्ष विसर्जित करणार का, असा सवाल नाना पटोले म्हणाले.

 महा विकास आघाडीची पताका सांभाळताना पटोले म्हणाले की नवाब मलिकांच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत. कोर्टानं अगर ते सिद्ध झालं तर निश्चितपणे त्यांना मंत्रिमडळात राहण्याचा अधिकार नाही याच्याशी सहमत आहे.

मात्र काँग्रेसची पताका सांभाळत  पटोले म्हणाले महाराष्ट्रात  कोणावरही आरोप करायचं, दुषित वातावरण करायचं त्याची बदनामी करायची, हे भाजपकडून राजकारण सुरु आहे त्यावर विश्वास कोण ठेवणार. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार