सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक संरक्षण फाउंडेशन च्या माध्यमातून बोईसर येथे कार्यक्रम संप्पन.

बोईसर - करोनाच्या पार्श्व भूमीवर पाहता सर्व प्रकाची सुरक्षा करून व सुरक्षित अंतर मास्क चा वापर करून

Sudarshan MH
  • Dec 25 2020 5:52PM
बोईसर - करोनाच्या पार्श्व भूमीवर पाहता सर्व प्रकाची सुरक्षा करून व सुरक्षित अंतर मास्क चा वापर करून  बोईसर मधील ग्राहक संरक्षण फाउंडेशन च्या माध्यमातून राष्ट्रीय ग्राहकदिनाच्या निमित्ताचे औचित्य साधून बोईसर तारापूर मधील कूडण येथील सॉलिटीअर हॉटेलच्या हॉल मध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला .खरे तर हा कार्यक्रम सरकारी असल्यामुळे.कलेक्टर च्या अधिपत्याखाली करण्यात आला पाहिजे. पण सरकारी अधिकारी वर्गाची  उदासीनता पाहता हा कार्यक्रम हा  ग्राहक  संरक्षण फाउंडेशन या  संस्थेच्या माध्यमातून  बोईसर मध्ये मागील ३ वर्षा पासून साजरा करीत आहेत.ह्याला फूड अँड ड्रग व वजन माप यांचे अधिकारी  यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावायची उदासीनता दाखवली.  
बोईसर मधील ग्राहक  संरक्षण फाउंडेशन या संस्थेनी ग्राहकांना होणाऱ्या फसवणुकीचा त्रासा पासून  व बऱ्याच ग्राहकांना होणाऱ्या फसवणुकीपासून न्याय मिळून दिला आहे.या संस्थे कडे बऱ्याच तक्रारी येत असतात.तसेच ग्राहकांना   आत्ता बऱ्याच  वेळी  मद्दत करून त्यांना न्याय मिळून दिला जातो.तसेच आपल्या क्षेत्रातील खेळाडू,नामवंत उद्योजक,समाज सेवक,  यांचा  ह्या संस्थें तर्फे मानपत्र,सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.ह्या  कार्यक्रमाला सरकारी अधिकारी  येणे गरजेचे असताना देखील हे सरकारी अधिकारी अशा कार्यक्रमात उपस्थित राहत नाहीत  वेळ देत नाहीत ही उदासीनता दिसून येते.अशी ही खेदाची बाब आहे. आज ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटक  जिल्हा परिषद अध्यक्ष भारतीताई कामडी  यांनी श्री गणेशमूर्ती च्या  प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.तसेच ग्राहकांचे होणारे फसवणुकी संदर्भात त्यांनी थोडक्यात माहिती दिली व या संस्थेला कोणतीही मदत लागली तर आम्ही आपणास सहकार्य करू असे सांगितले .  विधानसभा बोईसर चे आमदार  राजेश पाटील यांनी देखील ग्राहकांना होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत .यांच्या देखील तक्रारी आमच्या पर्यंत येत असतात .आम्हीआपल्या ग्राहक संस्थे कडे मार्गदर्शनासाठी पाठवू. मिलींद चूरी ग्राहक संरक्षण फाऊंडेशनचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद चूरी,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  विनोद गायकवाड यांनी देखील संस्थें संदर्भात थोडक्यात माहिती दिली.या संस्थेचे सल्लागार  अॅड. दीपक सावले यांनी देखील थोडक्यात माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष   डी व्हीं.पाटील यांनी ग्राहक संरक्षण फाऊंडेशन च्या संस्थे सदर्भात पूर्ण माहिती देऊन मार्ग दर्शन केले.या नंतर गजानन पाटील (प्रोजेक्ट ऑफिसर)यांनी ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणूक चे  प्रात्यक्षिक रित्या  फसवणूक कशी होते ते दाखवून सभासदांची मने जिंकून घेतली .या वेळी संतोष राणे . रियाज मुल्ला, सौ.दर्शना पाटील, विजय शेट्टी,निलेश नगरकर,मंगेश नगरकर , सौ.रूचिता पाटील, प्रीती सामंत,अॅड.चारुशीला प्रभू, रवि राठोड,सौ.प्रिया,दीप्ती महाडिक,गिरीश देव,महेश संखे,मंगेश राऊत,व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्य क्रमाचे सूत्र संचालन संस्थेचे राष्ट्रीय महासचिव निलेश भोईर यांनी केले. तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी केले.-

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार