सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
तळोदा कलावती फाऊंडेशन च्या फार्म हाऊस येथे करण्यात आली. या दोन दिवसीय शिबीराचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आहे. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हयाचे प्रभारी श्री.बबनभाऊ चौधरी, आमदार राजेश पाडवी, प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र गावित, संघटन सरचिटणीस निलेश माळी, सरचिटणीस राजेंद्र गावित, शहराध्यक्ष योगेश चौधरी, हेमलाल मगरे, कौशल सवाई, बळीराम पाडवी, उपनगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष सानुबाई वळवी, प्रविणसिंग राजपुत, शिरीष माळी, भारती कलाल, रशिलाबेन देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी कार्यकर्त्यांना दोन दिवस पुर्ण वेळ सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळीस जिल्हा प्रभारी बबन चौधरी यांनी नंदुरबार जिल्हा भाजपाचे कार्य उत्तर महाराष्ट्रात उत्तम असल्याचे नमुद केले.