सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा 1 डिसेंबरनंतर सुरू होतील

आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा 1 डिसेंबरनंतर सुरू होतील

Nandurbar MH
  • Nov 24 2020 10:35AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार : राज्यात सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत. मात्र, कोरोना संसर्ग आणि उपायोजना लक्षात घेऊनच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा सुरु होतील, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी (K.C. Padvi) यांनी दिली. ते नंदुरबारमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. (K.C. Padvi on reopening of Ashram School)

'नंदुरबार जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा 1 डिसेंबरनंतर सुरू होतील. हा निर्णय घेण्यात आला असला तरी शासकीय आश्रम शाळा सुरू करताना कोरोना परिस्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल.तसेच, शाळा सुरु करताना कोरोनासंदर्भात कोणत्या उपायोजना करण्यात आल्या आहेत याचाही आढावा घेतला जाईल. त्यानंतर शासकीय आश्रमशाळा सुरु करण्यात येतील,' असे पाडवी म्हणाले. तसेच, यावेळी शाळा सुरु करण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (K.C. Padvi on reopening of Ashram School)

आधी अधिकाऱ्यांसोबत बैठक नंतर निर्णय

राज्यात बहुतांश जिल्ह्यांत इयत्ता नववी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मास्क वापरणे, शाळेत सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे, शाळेचा परिसर वेळोवेळी सॅनिटाईझ करणे अशा प्रकारचे कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा 1 डिसेंबरनंतर सुरु होतील. त्यासाठी योग्य ते सर्व नियोजन करावे लागेल. त्याशिवाय शाळा सुरू करता येणार नाहीत, असे स्पष्ट मत के. सी. पाडवी व्यक्त केले. त्यासाठी मंगळवारी (24 डिसेंबर) राज्यातील सर्व आदिवासी विकास विभागाचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. त्यांना त्या त्या परिसरातील कोरोना परिस्थिती विचारली जाईल. त्यानंतरच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय होईल, असेही के. सी. पाडवी यांनी सांगितले. (K.C. Padvi on reopening of Ashram School

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार