सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जनताभिमुख तक्रारीची दखल घेत-वराह उच्छादाचा त्रास दोंडाईचा नगरपालीकेने कमी केला

नागरिकांनी उघड्यावर नाशवंत,खराब,टाकावू कचरा न फेकता घंटागाडीत द्यावा-आरोग्य सभापती सौ.कल्पना नगराळे

Nandurbar MH
  • Jul 29 2021 8:12AM


नागरिकांनी उघड्यावर नाशवंत,खराब,टाकावू कचरा न फेकता घंटागाडीत द्यावा-आरोग्य सभापती सौ.कल्पना नगराळे

दोंडाईचा - शहरात अनेक महिन्यांनपासुन वराह (डुकरांचा) उच्छादाचा त्रास रहिवासी,दुकानदारांना व बाहेरून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना जाणवत होता. म्हणून नागरिकांच्या ह्याच जनताभिमुख तक्रारींची दखल घेत दोंडाईचा वरवाडे- नगरपालीकेने वराहांचा बाहेरगावी पाठवत बदोंबस्त केला आहे.तसेच रहिवाशी नागरीक, दुकानदार यांनी घरापुढे, दुकानापुढे कचरा न टाकता घंटागाडीत टाकावा,असे आवाहन आरोग्य सभापती सौ.कल्पना नगराळे व त्यांचे प्रतिनिधी कुष्णाभाऊ नगराळे यांनी जनतेला केले आहे.

येथे दोंडाईचा वरवाडे- नगरपालिका स्वच्छता व आरोग्य विभागाने माजी मंत्री, आमदार जयकुमारभाऊ रावल साहेब आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय ताईसाहेब नयनकुवरजी रावल यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छता व आरोग्य विभागामार्फत दोंडाईचा शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर खाजगी शौचालय बांधकामासाठी शासकीय अनुदान उपलब्ध करुन दिल्याने शहरातील अनेक भागात नागरिकांनी खाजगी शौचालय बांधून घेतले आहे. त्यामळे जे नागरिक प्रांतविधीसाठी नदी , नाल्याकडे बाहेर जात होते ते बंद झाले आहे. यामुळे दोंडाईचा शहर हे हागणदारीमुक्त झाल्याने नदी, नाल्यांमध्ये असणाऱ्या डुकरांचा कल हा रहिवासी भागात व दुकानांनबाहेर वाढला आहे. दोंडाईचा शहर हे स्वच्छ व सुंदर असावे तसेच आपले आरोग्य सुदृढ रहावे यासाठी नागरिकांनी घरातील व दुकानातील कचरा हा बाहेर गटारीत व उघड्यावर टाकू नये यासाठी प्रत्येक वार्डात घंटागाडीचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु काही भागात नागरिक हे घंटागाडीचा उपयोग न करता घरातील व दुकानातील कचरा हा गटारीत व उघड्यावर टाकत असल्याने डुकरांचा कल त्याठिकाणी वाढला आहे. तरी नागरिकांना विनंती असेल त्यांनी सदरील कचरा हा गटारीत अथवा बाहेर उघड्यावर न टाकता जास्तीत जास्त घंटागाडित टाकावा जेणे करून रहिवासी भागात डुकर येणार नाहीत अशी भावना,विनंती वजा आवाहन आरोग्य सभापती सौ.कल्पना नगराळे व त्यांचे प्रतिनिधी कृष्णा नगराळे यांनी यावेळी केली आहे.


शहरात दैनंदिन डुकरांचे रहिवासी भागात वाढते प्रमाण यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले होते. यामुळे माजी मंत्री,आमदार जयकुमारभाऊ रावल आणि नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सभापती सौ.कल्पना नगराळे व त्यांचे प्रतिनिधी कृष्णा नगराळे, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम,आरोग्य अधिकारी शरद महाजन,संतोष माणीक उपनगराध्यक्ष, सर्व सभापती व नगरसेवक यांच्या नियोजनानुसार दोंडाईचा शहरातील संबंधित डुक्कर मालकांना बोलावून डुकरांचा बंदोबस्त केला नाही तर गुन्हा दाखल करून कडक कार्यवाही करण्यात येईल अश्या सूचना नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आल्यामुळे संबंधित डुक्कर मालकांकडून ताबडतोब डुक्करांना पकडून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार