सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसेना महिला आघाडी नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख सौ. विद्याताई साळी यांचे आढावा बैठकीत आवाहन

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आता गाव आणि वार्ड तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार करीत

Nandurbar MH
  • Aug 17 2021 10:31AM

नवापूर प्रतीनिधी गणेश वडनेरे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आता गाव आणि वार्ड तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक तयार करीत शिवसेना महिला आघाडीचे संघटन सक्षम करण्याचा संकल्प सर्व महिला पदाधिकारी यांनी करावा तसेच महिला सबलीकरण व बचत गटाच्या माध्यमातून स्वता सक्षम होत जास्तीत जास्त महिलांना शिवसेना पक्षाची विचारधारा समजावून,पक्षासोबत जोडून *पक्ष संघटन मजबूत करावे* असे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख
 *सौ. विद्याताई साळी* यांनी केले. *सर्किट हाउस नंदुरबार* येथे आज  शिवसेना नंदुरबार जिल्हा महिला आघाडीच्या *आढावा बैठकीत* त्या बोलत होत्या
बैठकीत नंदुरबार जिल्हाप्रमुख मा.श्री.आमश्या दादा पाडवी,महिला आघाडी नंदुरबार जिल्हा संघटक सौ.रिनाताई पाडवी,उपजिल्हाप्रमुख श्री.रविंद्रसिंह गिरासे,युवासेना उप जिल्हा अधिकारी श्री .रोहित चौधरी, श्री.काना नाईक,तालुका महिला पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी जिल्हाप्रमुख *मा.श्री.आमश्या दादा पाडवी* यांनी पुरुषांच्या सोबतच भगिनींना सहकार्य करीत महिला आघाडी मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे व मा. श्री.उद्धव ठाकरे साहेब यांनी गोरगरीब जनतेसाठी लोकहिताचे घेतलेले निर्णय व  योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवत सर्वानी लसिकरण करून घ्यावे असे सांगितले. महिला आघाडी जिल्हा संघटक *सौ.रिनाताई पाडवी* यांनी शिवसेना महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक यांची कार्यपद्धती समजावून सांगितली व आगामी काळात जिल्ह्यात महिलांचे जास्तीत जास्त संघटन करून शिवसेना पक्षाचे हात बळकट करणार असल्याचे सांगितले,उप जिल्हाप्रमुख *श्री.रविंद्रसिंह गिरासे* यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांचे मतदेखील मान्यवरांनी समजून घेतले. बैठकीस नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी सूत्रसंचालन.सौ सुनिताताई पाडवी उपजिल्हाप्रमुख.......यांनी केले तर आभार..मंगलाताई वळवी उपतालुकाप्रमुख..यांनी मानले

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार