सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वीजबिल माफ केलं नाही तर सोमवारी संपूर्ण राज्यात वीज बिलाची होळी पेटवून महाआंदोलन करू-- चंद्रशेखर बावनकुळे

पाच कोटी जनता वीजबिल माफीची जनता वाट पाहते आहे.  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आता घोषणा केली वीज बिल माफ करणार नाही, सरकारने लवकर चौकशी करावी आणि एक महिन्यात रिपोर्ट सादर करावा. सरकारनं चौकशी करत बसावे, पण त्या आधी वीज बिल माफ करावे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

Snehal Joshi .
  • Nov 20 2020 11:52PM
नागपूर: महावितरण महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे, ती केंद्र सरकारची जबाबदारी नाही. भाजपाच्या कार्यकाळात तीन्ही कंपन्या फायद्यात होत्या. तेव्हा फायद्यात असलेली महावितरण कंपनी 11 महिन्यात तोट्यात आली कशी?, असा चौख सवाल भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महा विकास आघाडी सरकारला केला.  राज्य सरकारने वीजबिल माफीसाठी 5 हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी बावनकुळे यांनी मागणी केली आहे. यापूर्वी अनेक वेळा राज्य सरकारने अनुदान दिल्यानंतर वीजबिल माफी झाली असल्याचे त्यांनी उदाहरणासहस्पष्ट केले आहे. राज्यात भाजपचं सरकार असातना आम्ही पाच लाख वीज कनेक्शन आम्ही दिले आहेत. आम्ही राज्यातील 1 कोटी आर्थिक दुर्बल ग्राहकांचे घरगुती वीज बिल माफ करावे, यासाठी चार महिन्यापासून सरकारकडे मागणी करत आहोत. दिल्ली सरकारप्रमाणे 100 युनिटपर्यंत वीज माफ करु, अशी घोषणा सरकारने जनतेने न मागता केली. पण, 11 महिने होऊन गेले तरी अंमलबजावणी झालेली नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले. लॉकडाऊन काळातील गरिबांचं वीज बिल माफ करण्याची घोषणा सरकारने केली होती. पण, वीज बिल माफ केलं नाही. पाच कोटी जनता वीजबिल माफीची जनता वाट पाहते आहे.  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आता घोषणा केली वीज बिल माफ करणार नाही, सोबतच राज्य सरकारने 59149 कोटी थकबाकी महावितरणवर आहे, याची चौकशीची घोषणा केली आहे. सरकारने लवकर चौकशी करावी आणि एक महिन्यात रिपोर्ट सादर करावा. सरकारनं चौकशी करत बसावे, पण त्या आधी वीज बिल माफ करावे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. भाजपाच्या कार्यकाळात देशातील सर्वात जास्त वीज उत्पादन आणि वितरणाचा रेकॉर्ड आम्ही केला, तेव्हा तर तांत्रिक अडचण आली नाही, पण यांच्या काळात येते आहे. महावितरणची 56149 कोटी थकबाकी आहे, याची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यापैकी 16525 कोटींची थकबाकी गेल्या सरकारमधील होती. कृषी पंपांची 40 हजार कोटींची थकबाकी आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांची वीज कधीच कापली नव्हती. शेतकऱ्यांना वीज देणे चूक असेल तर आम्ही चुक केली. आमच्या कार्यकाळात सरकारने शेतकऱ्यांना 32669 एम यू जास्तीची वीज दिली, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत मान्य केले. मात्र आता वीजबिल माफ केलं नाही तर सोमवारी संपूर्ण राज्यात वीज बिलाची होळी पेटवून महाआंदोलन करू , हा शेवटचा इशार भाजपनं दिला आहे. महावितरणने एकाही ग्राहकांची वीज तोडली तरी भाजप ला सांगा. आम्ही त्यांच्या सोबत उभे राहणार आहेत , असे आवाहन महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार