सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नियुक्ती आदेश 14 ऑक्टोबरपर्यंत न निघाल्यास 15 पासून आंदोलन : बावनकुळे

विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक, शाखा अभियंत्यांचे नियुक्ती आदेश 14 ऑक्टोबरपर्यंत ननिघाल्यास 15 पासून आंदोलन : बावनकुळे

Snehal Joshi .
  • Oct 1 2020 10:41PM
महावितरणमध्ये पाच हजार विद्युत सहायक, दोन हजार उपकेंद्र सहायक व 400 शाखा अभियंता अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश येत्या 14 ऑक्टोबरपर्यंत महावितरण प्रशासनाने काढावे. अन्यथा 15 ऑक्टोबरला नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे प्रदेश महासचिव व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानकुळे यांनी दिला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासन काळात आयटीआय अर्हता धारक व आयटीआय अप्रेंटिशिप धारक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने महावितरण कंपनीअंतर्गत अनुक्रमे 5 हजार विद्युत सहायक, 2 हजार उपकेंद्र सहायक तसेच 400 शाखा अभियंता यांना नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अर्ज करणे, आवश्यक त्या पदाची परीक्षा घेणे या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. फक्त संबंधित अर्जदारांची कागदपत्रे पडताळणी करून नियुक्ती करणे शिल्लक आहे. असे असताना या अर्जदारांना अजूनपर्यंत महावितरणने नियुक्ती दिली नाही.
विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक तसेच शाखा अभियंता यांच्या नियुक्तीचे आदेश 14 ऑक्टोबरपर्यंत काढण्यात आले नाही तर 15 ऑक्टोबर रोजी महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार