सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पारतंत्र्यात ही अंतिम श्वासापर्यंत आझाद असणारे क्रांती कारक चंद्रशेखर आझाद

क्रांती कारक चंद्रशेखर आझाद यांची आज दि.२३ जुलै रोजी जयंती आहे. तर स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, हा मंत्र देणा:या लोकमान्य टिळकांची देखील जयंती आहे. लोकमान्यांचा जन्म इ.स.१८५६ मध्ये तर चंद्रशेखरांचा जन्म १९०६ मध्ये  झाला.

लक्ष्मणलाल खत्री ८८०६१२२६५५
  • Jul 22 2020 11:15PM
कुटूंब वत्सल क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद
स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सर्वस्वाचा होम करणरे, पारतंत्र्यात ही अंतिम श्वासापर्यंत आझाद असणारे क्रांती कारक चंद्रशेखर आझाद यांची आज दि.२३ जुलै रोजी जयंती आहे. तर स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, हा मंत्र देणा:या लोकमान्य टिळकांची देखील जयंती आहे. लोकमान्यांचा जन्म इ.स.१८५६ मध्ये तर चंद्रशेखरांचा जन्म १९०६ मध्ये  झाला.
    चंद्रशेखर आझाद च नव्हे तर, १८५७ च्या स्वातंत्र्य युध्दा पासुन, स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंत ९० वर्षात जेवढे क्रांतीकारक झाले, त्यांच्या जीवनावर दृष्टीक्षेप टाकला  तर दिसुन येईल की, सदैव डोक्यावर तलवार लोंबकळत असतांना, मृत्यू समोर असतांना देखील या क्रांतीकारकांचे एक भावविश्व होते. ते कुटूंब वत्सल होते, आणि स्वातंत्र्याच्या अभिलाषेने एकत्रित आलेले, बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या वीरांमध्ये परस्परांशी भावपुर्ण नातं होते.
    वेगवेगळे भावविश्व होते. त्यात आगीशी खेळणारे चंद्रशेखरजी मनाने हळवे व कुटुंब वत्सल होते. आज मध्यप्रदेशात, गुजरात सीमेवर असलेला झाबुआ हा आदिवासी  बहुल जिल्हा आहे. तेथे भावरा या गावात गरीब, पण संस्कारक्षम ब्राह्मण परिवारात त्यांचा जन्म झाला. वडील पं.सीताराम तिवारी तथा  माता जगराणी देवी. त्यांच्या बाल सुलभ स्वभाव , अवघे १५ वर्षाचे वय असतांना त्यांनी मिरवणुकीत सहभगा घेतला. पोलीसांनी अटक करुन जिल्हा दंडाधिका:यांसमोर उभे केले. न्यायाधीश नाव विचारतात. शंतपणे म्हणतो माझे नाव आझाद आहे. वडिलांचे नांव विचारल्यावर तो स्वातंत्र्य असे उत्तर देतो, आणि पत्ता विचारल्यावर जेल खाना सांगतो.
    त्याला १५ फटक्यांची शिक्षा होते. कारागृहात त्याला दोन खांबावर बांधण्यात आले. तेव्हा म्हणतो मुझे बांधते क्यो हो? मै भागूगा नही, यहॉ खडा हुॅ मारो, जितना दम है उतना मारो, आणि प्रत्येक फटका उघड्या अंगावर खातांना ते म्हणत होते. वंदे मातरम, भारत माता की जय त्यावेळी त्यांना झालेल्या जखमांवर मलमपट्टी करण्यासाठी शासनाने जेल मॅन्युअल नुसार तेव्हांचे ३ आणे देण्यात आले.
    ते १९ वर्षाचे असतांना १९२५ मध्ये कांतीकारकांनी जे हिंदुस्थान रिपब्लीकन आर्मी चे सदसय होते, त्यांनी काकोरी कांडास मुर्तरुप दिले, त्यात आझाद सहभागी होते. त्यानंतर ते भूमिगत कार्य करु लागले. त्यांची शरीयष्टी काटक व पिळदार होती. डोक्यावर कुरळे  केस  व गो:यापान चेह:यावार भारदस्त मिशा असे त्यांचे आकर्षक व्यक्तीमत्व हेते,ते निष्णात  नेमबाज  होते. ते भगतसिंहास म्हणाले की, सुली तुम्हे मुबारक हो, मेरी सुलीपर झुलने की तमन्ना नही. मेरे पास जबतक मावजर पिस्तौल है, तबतक कोई मुझे जीवित नही पकड सकता.
    त्यांचे हे शब्द, १९३१ मध्ये खरे ठरले. प्रयागराज (अलाहबाद) येथील अल्फे्रड पार्क मध्ये, वेडलेल्या अनेक पोलीसांना कंठस्नान घालून शेवटच्या गोळीने त्यांनी भारत मातेचा जयजयकार करत आत्मोसर्ग केला, ती दिनांक आहे २७ फेब्रुवारी १९३१. हा अल्फै्रड पार्क नेहरु परिवारांच्या आनंद भवन रस्त्यावर आहे. आज त्या जागेस आझाद पार्क म्हणतात. ज्या जांबळीच्या झाडाखाली वीरगती प्राप्त केली तेथे पूजा स्थान झाले. लोक येवून फुलं वाहत. पण दुर्देव असे की, अहिंसावादी काँग्रेस वाले त्यांच्या अंत्यसंस्कारापासून दूर राहीले. राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन व पदमकांत मालवीय यांनी अंत्यसंस्कारात पुढाकार घेतला होता.
    असे हे चंद्रशेखर यांचे एक भावविश्व होते. भगतसिंह, सुखदेव, राजगुरु, सदाशिवराव मलकापूरकर, यवतमाळ जिल्ह्यातील डेहणीचे डॉ.सावरगांवकर, भगवतीचरन वोरा त्यांच्या पत्नी दुर्गाभाभी, सुशीला देवी यांच्यात बंधुत्वाचे नातं होतं. ते सर्वांच्या प्रकृतीची काळजी घेत. एकदा सुखदेवराज यांच्या पायात बॉम्बचा तुकडा घुसला. धन्वंतरी नावांच्या क्रांतीकारकाने डॉ.आसाराम पंचरतन यास बोलावून पायाची शल्यक्रिया करुन काढला. (हे सुखदेवराज वेगळे होते. भगतसिंहाबरोबर फासीवर गेलेले सुखदेव दुसरे होते.)
    भगवतीचरण वोरा यांची पत्नी  दुर्गादेवी प्रत्यक्ष सक्रिय होत्याच, त्यांना सर्व दुर्गा भाभी म्हणत. दि.२८ मे १९३० रोजी बॉम्बची चाचणी घेतांना स्फोट झाला, त्यात भगवती चरण यांचा मृत्यू झाला. दोनचार दिवसांनी बटुकेश्वर दत्त व भगतसिंह यांना सोडवण्याची योजना आखली त्यासाठी दिनांक १ जून १९३० चा मुहूर्त ठरला. त्यावेळी पतिच्या मृत्यूस चार दिवस होत नाही तर, पति वियोगाचे दु:ख विसरुन वीर पत्नी म्हणाल्या मला देशभक्तांच्या सुटकेच्या मोहीमेत सहभागी करा.
    चंद्रशेखर म्हणाले, भाभीजी, मी आपल्या भावनांचा सन्मान करतो, पण यावेळी तुम्ही स्वस्थ बसा, पुढे कोठे तरी निश्चित संधी देऊ. अजुन तुमचा सचिंद्र लहान आहे व त्याला तुमची गरज आहे. दुर्गादेवीस मोठ्या भावाप्रमाणे चंद्रशेखरने समजावले कि, आम्ही त्यांना सोडवून आल्यावर त्यांना सुखरुप सांभाळण्याची त्यांना दोन घास भरवण्याची काळजी घ्यावी.
    असे कितीतरी भावस्पर्शी प्रसंग आहेत. दुर्गाभाभींची एक एणखी आठवण मुंबईत असतांना वैशंपायन यांनी त्यांची व सुखदेवराज यांच्या निवासाची सोय शांता क्रुझ येथील टागोर व्हिला येथे केली होती. बाबाराव सावरकरांचे घर  जवळ असल्याने दुर्गा भाभी त्यांच्या घरी जात होत्या. सावरकर कुटूंबाशी संबंध आला होता. त्यावेळी  त्यांनी शांताबाई सावरकर, (विक्रम सावरकरांच्या मातोश्री) यांनी दुर्गा भाभींना नऊवारी पातळ घालणे शिकवले होते. मुंबईत दुर्गा भाभी व सुखदेवराज सोबत आलेले विश्वनाथ वैशंपायन यांना मुंबईतील गणेश वैशंपयान, शंकर मोघे, जनार्दन बापट, शिवराम देवधर या मराठी तरुणांची साथ होती. यांच्यात नांत काय? तर मातृभूमीच्या स्वातंत्र्याची ओढ.
हुतात्माओंके विस्मरणसे
आजादी ढलती हुअी सांझ हो जाएगी
वीरता की पूजा नही करेंगे तो
वीरताही वांझ होजायेगी

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार