सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ ? दापोलीतील रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा

रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा

Sudarshan MH
  • May 14 2021 12:36PM
 
मुंबई : परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत परब यांच्याबाबत एक तक्रार केलीय. ही तक्रार परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबत आहे. हा रिसॉर्ट परब यांनी काळ्या पैशातून बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. फक्त जावडेकरच नाही तर सोमय्या यांनी याबाबत ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार केलीय. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. 
 
“पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा ( काळा पैसा) बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही मी तक्रार केली आहे’, असं ट्वीट करत सोमय्या यांनी याबाबत माहिती दिलीय.
 
अनिल परब यांचं उत्तर
किरीय सोमय्या यांच्या या आरोपांवर अनिल परब यांनीही उत्तर दिलंय. पत्रकारांनी सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारलं असता,सोमय्यांच्या आरोपांना आम्ही त्या त्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देऊ, असं अनिल परब म्हणालेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार