सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बहुजन सत्यशोधक संघ यांच्या वतीने माता रमाई यांची जयंती मोठया उत्साहात साजरी

बहुजन सत्यशोधक संघातर्फे माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून

Sudarshan MH
  • Feb 10 2021 4:21PM
 
पालघर - बहुजन सत्यशोधक संघातर्फे माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व कारेक्रमाची सुरवात केली. त्यावेळी प्रमुख उपस्थिती संस्थापक अध्यक्ष मा.सुनिलजी ओहोळ साहेब,कारेक्रमाचे अध्यक्ष मा.गणेश देवकते,जिल्हा अध्यक्ष मा.प्रदीप परकाळे,बहुजन सत्यशोधक चालक-मालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मा.विजय गाजरे,आदरणीय नागनाथ ओहोळ,मा.वसंत ताकतोडे उपस्थित होते. त्यावेळी मा. सुनिलजी ओहोळ यांनी माता रमाई यांना अभिवादन करून मार्गदर्शन केले ते म्हणाले माता रमाई चे विचार प्रत्येक महिलेने आत्मसात केले पाहिजे. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवले पाहिजेत. बहुजन सत्यशोधक हा महापुरुषांच्या दाखवलेल्या दिशेवर चालणार संघ आहे, बहुजन समाजातील सर्व लोकांसाठी अन्याय व अत्याचार झालेल्या लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे समाज्याच्या पाठीशी कायम राहील असे सांगितले.अन्याया विरोधात लढण्यासाठी सत्यशोधक संघ कायम तुमच्या मदतीला धावून येईल असे सांगण्यात आले,व येणाऱ्या काळात सत्यशोधक संघ समाज्याच्या अन्यायाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जाईल असे सांगण्यात आले.माता रमाई जयंतीचे औचित्त साधून काही पदाधीकर्यांच्या निवडी करण्यात आल्या, महिला सोलापूर जिल्हाध्यक्षा म्हणून मा.ज्योती भुजंगे यांची निवड करण्यात अली, महिला पंढरपूर तालुका अध्यक्षा मा.पूजा झरकर यांची निवड करण्यात आली. महिला पंढरपूर शहर अध्यक्षा मा.अनुराधा आंबरे यांची निवड करण्यात आली,पंढरपूर तालुका युवा अध्यक्ष मा. ओंकार आंबरे यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष मा.सुनिलजी ओहोळ यांच्या हस्ते संघटनेचे नियुक्ती पत्र देऊन पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी कारेक्रमाचे अध्यक्ष मा.गणेश देवकते यांनी मनोगत व्यक्त केले, ते म्हणाले बहुजन सत्यशोधक संघ सत्यासाठी वेळोवेळी संघर्ष करत आहे लोकांना न्याय देण्याची भूमिका बहुजनांच्या एकीतून साकार होताना दिसून येत आहे, शाहु, फुले,आंबेडकर यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम सत्यशोधक जिद्दीने करत आहे.शाहू,फुले,आंबेडकर यांची विचारधारा आणि सत्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी लवकरच प्रत्येक गांवात सुरू केली जाईल असे सांगण्यात आले.आमच्या महिला चूल आणि मूल यामध्ये गुंतलेल्या आहेत,यातून बाहेर पडून माता रमाई,राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्याबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, यांचे आदर्श घेऊन समाजासाठी पुढे आले पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळी मध्ये मोलाची साथ माता रमाई ने दिले,व सर्व गोष्टींचा त्याग करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत काम केले,म्हणून त्यांना त्यागमूर्ती माता रमाई असे म्हणतात.प्रत्येक घरात माता रमाई, माता जिजाऊ,माता अहिल्या,माता सावित्री तयार झाली पाहिजे असे मार्गदर्शन केले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष मा.प्रदीप परकाळे बोलताना म्हणाले,महाराष्ट्रात प्रस्थापित बहुजन समाजातील लोकांसाठी सत्यशोधक संघ काम करत आहे.माता रमाई यांच्या त्यागातून हे वैभव आम्हाला मिळले आहे.माता रमायचे त्याग वाया जाऊ देऊ नये ,मीठ मिरची भाकरीच्या तुकड्यासाठी, आपले मत विकू नका.स्वाभिमानाने जागा, लोकांमध्ये स्वाभिमान जागरूक करण्यासाठी त्यांना सत्य इतिहास सांगा. दहा दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्ष्या एक दिवस वाघ म्हणून स्वाभिमानाने जागा.कारण कोंबड्याची, बोकडांची बळी दिली जाते वाघाची नाही. आपण शाहू,फुले,आंबेडकर यांचे वारस आहोत.माता रमाई जयंती निमित्त संकल्प घेऊ महापुरुषांचे विचार घराघरात पोहचवू असे सांगण्यात आले. त्यावेळी आभार मा. पूजा झरकर यांनी मांडले.सूत्र संचालन मा.अनुराधा आंबरे यांनी केले कारेक्रमासाठी सर्व स्तरावरील महिला मोठया संख्येने उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार