सुदर्शन न्युज नंदुरबार केतन रघुवंशी
नंदुरबार - मकर संक्रांतीच्या दिवशी छतावर डीजे आणि स्पीकर वाजवला म्हणून पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नंदुरबार शहर पोलिसांनी ही कारवाई केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे ऊघडपणे ऊल्लंघन करून अजान देणाऱ्या भोंग्यांवर देखील कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवावे; अशी प्रतिक्रिया जनमानसातून उमटली आहे.
अधिकृत वृत्त असे की मकर संक्रांतीच्या दिवशी छतावर मोठ्या आवाजात स्पीकर आणि डीजे अधिक वेळ वाजवला म्हणून नंदुरबार शहरातील दादा गणपती परिसरात कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गौरव अरुण सोनार, विशाल रवींद्र जगदाळे, ओम जितेंद्र सोनार, प्रवीण मिलिंद तिडके, कालू पुनम नेतलेकर या पाच जणांविरुद्ध भादवि कलम 268 269 290 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) चे ऊल्लंघन केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, संक्रांत, होळी, शिवजयंती, गणपती स्थापना आणि विसर्जन अशा हिंदुंच्या विशिष्ट सनावळी प्रसंगीच लागू केले जाणारे कायदे नियम अन्य धर्मियांना का लागू केले जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशिष्ट जयंती प्रसंगी ऊशीरापर्यंत मिरवणूका चालू देण्याची मुभा दिली जाते. मोहर्रम आदी प्रसंगी निघणाऱ्या मिरवणुकांनी तर नंदुरबारमध्ये विक्रम स्थापित केला आहे. अशावेळी काटेकोर कायदे नियम राबवणारे पोलीस दखल घेत नाहित, हा नंदुरबार वासियांचा अनुभव आहे. धक्कादायक बाब अशी आहे की, उच्च न्यायालयाने काही वर्षापूर्वीच मशिदीवरील मोठ्या आवाजात वाजणारे भोंगे बंद करण्याचा आदेश दिलेलाा असतानाही आज पर्यंत ते चालू ठेवण्यात आले आहेत. मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे वर्षातून एकदा मोठ्या आवाजात वाजणारा डीजे पोलिसांना ऐकू येतो मग वर्षाचे 365 दिवस रोज रोज अजान देणारे भोंगे पोलिसांना ऐकू येत नाही काय? असाा संतप्त प्रश्न युवकांमध्ये उपस्थित केला जात आहे. उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही प्रार्थना स्थळांवरील भोंगे चालू ठेवून उच्च न्यायालयाचा अवमान केला जात आहे. त्याच बरोबर त्या आदेशाचा सन्मान ठेवून पोलिसांनी अद्याप एकही कारवाई न करून एक प्रकारे पोलीस दल सुद्धा उच्च न्यायालयाचाााा अवमान करीत आहे. पोलीस दल उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे थांबवेल काय? असाही प्रश्न जनमानसातून केला जात आहे.