सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चेहऱ्यावर तणाव नाही. कारण जनतेचा विश्वास.*

जनतेचा हा विश्वास मला बळ देणारा आहे. त्यामुळंच माझ्या चेहऱ्यावर तणाव दिसत नाही,' असं प्रतिपादन मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केलं.

Snehal Joshi .
  • Jul 25 2020 1:48PM
आज का वृत्तवाहिनीवर ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध झाली.त्यात महाराष्ट्राच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. जनता सरकारचं ऐकते आहे. सहकार्य करते आहे. जनतेचा हा विश्वास मला बळ देणारा आहे. त्यामुळंच माझ्या चेहऱ्यावर तणाव दिसत नाही,' असं प्रतिपादन मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केलं. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'ला दिलेल्या उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेली ही पहिली प्रदीर्घ मुलाखत आहे. खासदार संजय राऊत यांनी गेले काही दिवस केलेल्या ट्वीटमुळं मुलाखतीची उत्सुकता वाढली होती. अपेक्षेप्रमाणे उद्धव यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तर दिली. करोनाच्या संकटात जगातील अनेक नेते तणावाखाली दिसतात. पण आपल्या चेहऱ्यावर तणाव नाही याचं रहस्य काय, या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी जनतेचा विश्वास असं उत्तर दिलं. ते म्हणाले, 'करोनाच्या काळात फेसबुकच्या माध्यमातून मी लोकांशी संवाद साधला. जनतेशी नातं तुटू दिलं नाही. सरकार प्रत्येक पावली तुमच्या सोबत आहे असा विश्वास दिला. जनतेनंही माझ्यावर, सरकार विश्वास ठेवला. सहकार्य केलं. अजूनही जनता सोबत आहे. सहकार्य करते आहे. हा विश्वास मला बळ देणारा आहे. हे बळ जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला ताणतणावाची चिंता करण्याची गरज नाही.'

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार