सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागपूर गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान

विदर्भवाद्यांनी गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याच्या शासन निर्णयाची होळी आज नागपूर शहरात केली. तर आदिवासी समाज के संघटनांनी जिल्हाधिकारी ठाकरे यांना डेपुटेशन दिले. त्यांची मागणी आहे की या प्राणी संग्रहालयास 'गोंडवाना अंतर राष्ट्रीय प्राणी उद्यान' असे नाव देण्यात यावे.

Snehal Joshi .
  • Jan 20 2021 10:59PM
नागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली .  नागपूर जवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान  साकारण्यात येत असून त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा  उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारीत असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी भारतीय सफारीचे उद्घाटन गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे वैविध्यपूर्ण असून त्यामधील भारतीय सफारीचे काम पूर्ण झाले आहे. ही सफारी 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनतेसाठी खुली केली जाणार आहे. या भारतीय सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारी कार्यान्वित करण्यासाठी प्राण्यांचे स्थलांतरण सुद्धा करण्यात आलेले आहे. भारतीय सफारीचे उद्घाटन  झाल्यानंतर 40 आसन क्षमतेची 3 विशेष वाहने व ऑनलाईन तिकिट बुकींग सुविधा जनतेसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर उभारणी   जवळपास 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारण्यात येत असून यामधील महत्वाची कामे महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांचेकडून पूर्ण करण्यात आलेली आहेत. उद्यानातील सुविधा नागपूर शहराच्या मध्यापासुन गोरेवाडा हे ठिकाण फक्त 6 किलोमीटर असून भविष्यात हे एक महत्वाचे व मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचा शासनाचा मानस आहे. हा प्रकल्प नागपूर शहरास लागुन असल्याने या प्रकल्पामुळे या भागात निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होणार आहेत. वन्यजीव संवर्धन, संशोधन व शिक्षण तसेच वन्यजीवांचे पुनर्वसन याबाबतचे कामही  या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात केले जाणार आहे. प्राणी उद्यानात ये-जा करणाऱ्या पर्यटकांकरीता पार्किंग, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, वाहने इत्यादी सुविधा करण्यात आलेल्या आहेत, अशी माहितीही वन मंत्री संजय राठोड यांनी दिली. मात्र या सर्व प्रकाराचा विदर्भातल्या राजकारणात असंतोष दिसून आला गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गालाबाळासाहेब ठाकरेंचे नाव म्हणजे विदर्भातील लोकांवर अन्याय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पदाचा गैर उपयोग करत आहेत. असा आरोप करत विदर्भवाद्यांनी गोरेवाडा प्राणी संग्रहालयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याच्या शासन निर्णयाची होळी आज नागपूर शहरात केली तर आदिवासी समाज के संघटनांनी जिल्हाधिकारी ठाकरे यांना डेपुटेशन दिले. त्यांची मागणी आहे की या प्राणी संग्रहालयास 'गोंडवाना अंतर राष्ट्रीय प्राणी उद्यान' असे नाव देण्यात यावे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार