सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*राज्यातील हॉटेल सुरू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय- मुख्यमंत्री ठाकरे

महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगांचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्य पद्धती तयार केली असून, त ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Snehal Joshi
  • Jul 5 2020 10:09PM
मिशन बिगीन अगेन मध्ये राज्यात आपण उद्योग-व्यवसाय सुरू केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगांचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरू करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्य पद्धती तयार केली असून, त ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज राज्यातील हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वलसा नायर सिंह सहभागी होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवसाय व्यवस्थापन आणि आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की मुंबई व शहरातील सर्व हॉटेल्स या कोरोना युद्धात आपल्या बरोबर आहेत. त्यासाठी त्यांचे अभिनंदन, पर्यटन व्यवसायातील महत्त्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉज सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक अभ्यागत प्रवासी निरोगी असेल यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करावी लागेल, कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आता आपण सलून ला परवानगी दिली आहे. ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डाय साठी. जिम देखील बंद ठेवले आहे. कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हॉटेल सुरू करायला काही हरकत नाही. मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्य पद्धती प्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक जे कामगार कर्मचारी आपल्या हॉटेलमध्ये आहेत त्यांना काढू नका. आता आपण काहीतरी मार्ग निश्चित काढू. या संकट समय कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत. असे मुख्यमंत्री म्हणाले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले. कारण पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजना देऊ शकतो. हे आपल्याला माहिती आहे. मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर व इतर मोठ्या शहरात आम्ही सगळे व्यवहार सुरू करताना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नात हॉटेल्स आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. कोरोना नंतर हॉटेल उद्योगात परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे . प्रत्येक ठिकाणी सरकारला या नियमांची पूर्तता होते किंवा नाही हे पाहणे शक्य नाही त्यासाठी स्वयंशिस्त ठेवणे गरजेचे आहे.   

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार