सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे व थोरात यांची विशेष बैठक, राजस्थानच्या पायलटांवर विशेष चर्चा*

राजस्थान सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध पावित्रा घेतला आहे. आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र काँग्रेसची चाचपणी केली. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बैठक पार पडली.

Snehal Joshi
  • Jul 14 2020 11:29PM
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यामुळे ते आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा आशयाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. पण आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे सचिन पायलट यांनी सांगितले आहेच . भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची सचिन पायलट भेट घेणार असून यावेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण एनडीटीव्हीशी बोलताना हे वृत्त सचिन पायलट यांनी फेटाळून लावल्याचे वृत्त आहे. आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली आहे. काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहण्याची चिन्ह असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्हिप जारी करत काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शंभरहून अधिक आमदार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर आमदार बसने बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी ऑल इज वेल अशी प्रतिक्रिया दिली. राजकीय भूकंप राजस्थानमध्ये झाला असला तरीही त्याचे हादरे महाराष्ट्रात बसत आहेत. राजस्थान सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध पावित्रा घेतला आहे. आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र काँग्रेसची चाचपणी केली. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बैठक पार पडली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात जवळपास तासभर बैठक झाली. महाविकासाआघाडी सरकारला फटका बसू नये यासाठी काँग्रेसची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार