सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्री विकास कामांच्या आढाव्यासाठी राज्यभर करायला लागले आहेत दौरे....

आता करोनाचा जोर बऱ्याच प्रमाणात कमी झाला असताना व करोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन विकासकामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. विदर्भात हिंदू ह्रदय सम्राट बालासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग कामाचा आढावा घेण्यासाठी प्रथमच विदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येऊन गेले आहेत.

Snehal Joshi .
  • Dec 9 2020 10:44PM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानातून बाहेर पडत नाहीत, अशी टीका सातत्याने विरोधकांकडून होत असताना करोनाचा जोर थोडा कमी होताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकामागून एक दौरे सुरू केले आहेत. गेल्या आठ महिन्यांत करोनामुळे विकासकामांचा वेग मंदावला असून त्याला गती देण्यासाठीच मुख्यमंत्री प्रत्यक्ष फिल्डवर उतरल्याचे बोलले जात आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दौरे टाळण्याची भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री दौऱ्यावर येत असल्यास संबंधित सर्व यंत्रणांना त्यासाठी तयारी करावी लागते. तिथे गर्दी होणार हेसुद्धा निश्चित असते. ही बाब लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी तसा निर्णय घेतला होता. यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी सातत्याने टीका केली. मुख्यमंत्री मातोश्री निवासस्थानातून बाहेर पडत नाहीत. ते घरात बसून राज्याचा कारभार हाकतात. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिला नाही, अशा प्रकारची विधाने करण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांनी या टीकेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. करोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरेल, असे कोणतेही पाऊल मी उचलणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्याचवेळी ऑनलाइन माध्यमाचा प्रभावीपणे वापर करत मुख्यमंत्र्यांनी बैठकांचा धडाका लावला होता. आता करोनाचा जोर बऱ्याच प्रमाणात कमी झाला असताना व करोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन विकासकामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. विदर्भात हिंदू ह्रदय सम्राट बालासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग कामाचा आढावा घेण्यासाठी करून नंतर प्रथमच विदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येऊन गेले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार