सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खुद्द पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघातच लसीकरणाचा भोंगळ कारभार....!

परळी शहरातील लसीकरण सेन्टर वर सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

Abhimanyu
  • May 11 2021 2:11PM

परळी : -

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात लसीकरणाचा भोंगळ कारभार सुरू असून गेली 3 दिवसा पासून लसीकरण साठी शहरातील नागरी रुग्णालय, गणेशपार, TPS कॉलनी, नटराज रंगमंदिर येथे असंख्य नागरिक उभा आहेत मात्र लस संपली असल्याचं कारण देत इथून नागरिकांना परत पाठवलं जात आहे, आज दि 11 मे रोजी गणेशपार सेन्टर वर 400 लस उपलब्ध असताना याठिकाणी हजारो नागरिक लसीकरण साठी जमा झाले होते मात्र लस संपली हे कारण देत नागरिकांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. विशेष म्हणजे या नागरिकांमध्ये  8 तारखेला नोंदणी केलेली नागरिक सुद्धा उपस्थित होते.
शासनाने निवड केलेल्या या संबंधीत लसीकरण सेन्टर वर सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडत असून या कडे मंत्री महोदय आणि परळी वैद्यकीय अधीक्षक लक्ष देणार का  अशी चर्चा  सर्वसामान्यात रंगत असतानाच सोशल मिडियावरील पोस्ट वरती आहे वशिला तर लस माणसाला अश्या  प्रकारच्या कॉमेंटचा  पाऊस पडत आहे...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार