सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोलिसांनी बेदम मारहाण केलेल्या गेवराईच्या शेतकऱ्याची आमदार ॲड आशिष शेलार यांनी घेतली भेट

गेवराई, दि. 2 जून कोरोनाचे नियम पाळून खत व बियाणे खरेदी करण्यासाठी गेलेल्या गेवराई, किनगावचे शेतकरी मोतीराम चाळक यांना पोलीसांनी बेदम मारले.

Sudarshan MH
  • Jun 2 2021 12:46PM

गेवराई, दि. 2 जून 

कोरोनाचे नियम पाळून खत व बियाणे खरेदी करण्यासाठी गेलेल्या गेवराई, किनगावचे शेतकरी मोतीराम चाळक यांना पोलीसांनी बेदम मारले. बीड दौऱ्यावर असणाऱ्या भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी  आज या शेतकरी बांधवाची भेट घेतली. त्यांच्यावर झालेला अन्याय मंत्रालयापर्यंत पोहचवू, अशी ग्वाही दिली. तसेच संबंधित पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी आम्ही गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे करु असेही आश्वस्त केले.
 सोबत आमदार ॲड लक्ष्मण पवार व भाजपा पदाधिकारी होते.
लाँकडाऊनचे नियम आम्ही पाळतो. सकाळी 11 पर्यंत बी बियाणे खरेदी करण्यासाठी आम्ही जातो तर पोलीस आम्हाला मारतात मग बियाणे आणि खते शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने बांधावर  आणून द्यावे. जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका, असा टाहो ठाकरे सरकारच्या नावाने शेतकरी फोडतो आहे.
मराठा आरक्षणा बाबत पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार चार दिवसाच्या बीड आणि नांदेड दौऱ्यावर आहेत. आज बीड येथून या दौऱ्याला सुरुवात झाली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार