सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बुलढाणा जिल्ह्यात शनिवार व रविवारला संपूर्ण संचारबंदी...

बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता यापूर्वीच जिल्ह्यातील नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

Sudarshan MH
  • Feb 27 2021 10:19AM
बुलढाणा जिल्ह्यात शनिवार व रविवारला संपूर्ण संचारबंदी
(योगेश शर्मा)
बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता यापूर्वीच जिल्ह्यातील नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी ९ ते सायं ५ वाजेपर्यंत सुरू आहेत. मात्र शनिवार व रविवारला होणारी गर्दी लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यात शनिवार व रविवारला संपूर्ण संचारबंदी
त्यानुसार जिल्ह्यात दुध विक्रेते, दुध वितरण केंद्र सकाळी ६ ते दुपारी ३ व सायं ६ ते रात्री ८.३० वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील. या औषधी सेवा, दवाखाने, रूग्णवाहिका सेवा, एस टी वाहतूक ५० टक्के प्रवासी क्षमतेसह, माल वाहतूक, पेट्रोल पंप २४ तास सुरू असतील. टायर पंक्चरची दुकाने नियमित सुरू असतील. पुर्वनियोजीत परीक्षा वेळापत्रकानुसार होतील. बँकाचे कामकाज त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहील. या व्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने बंद राहतील. सदर आदेश प्रतिबंधीत क्षेत्रासाठी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ पासून व प्रतिबंधीत क्षेत्र नसलेल्या ठिकाणी सायं ५ पासून ते १ मार्च २०२१ चे सकाळी ८ वाजेपर्यंत लागू राहील. या कालावधीत संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरीकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार