कोरोनाने मृत झालेल्या पालकांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्व. दीनदयालजी वाधवाणी फाउंडेशन द्वारा करण्याचे जाहीर.
बुलढाणा : सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळित
.
समाजाप्रती आमचे हे कर्तव्य असून ते निभावण्याची हीच खरी वेळ आहे - अमित वाधवाणी
(योगेश शर्मा)
बुलढाणा : सध्या जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळित झालेले असून भारत सारख्या बलाढ्य देशाला सुद्धा यामुळे फार हानी झाली असून अनेकांचा या विषाणूने प्राणाचा बळी घेतला असून बऱ्याच घरातील कर्ता पुरुषच त्यांच्यापासून हिरावून गेले आहे. अश्यातच आज कुटुंब चालवणे कठीण होत असतांना आता मुलांच्या भविष्याबद्दल चिंता लोकांना वाटू लागली असून त्यांचे शिक्षण कसे पूर्ण होतील ? ही समस्या आ वाचून उभी ठाकली असतांना चिखली येथील स्व. दीनदयालजी वाधवाणी फाउंडेशनने यासाठी कर्तव्य म्हणून एक महत्वाचे पाऊल उचलत तालुक्यात कोरोनामुळे मृत्यु झालेल्या आई वडिलांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सार्थपणे उचलण्याचे प्रण घेतल्याचे आज जाहीर केले आहे.
स्व. दीनदयालजी वाधवाणी फौंडेशन हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते. अगदी पहिल्या लॉकडाऊन पासून विविध उपक्रम आणि मदतीच्या स्वरूपात माणुसकी जपली आहे. आणि पुन्हा आज दिनांक २२ मे २०२१ रोज शनिवारला फाउंडेशनचे अध्यक्ष अमित वाधवाणी यांनी मोठी घोषणा केली असून आता चिखली तालुक्यातील कुठल्याही गावात कोरोना काळात कोरोनाने आई किंवा वडिलांच्या मृत्यूने अनाथ झालेली मुलांच्या कक्षा पाहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी हाती घेतल्याचे सांगितले आहे. तर समाजाप्रती आमचे हे कर्तव्य असून ते निभावण्याची हीच खरी वेळ असल्याचे वक्तव्य यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित वाधवणी यांनी करून तालुक्यातील अश्या अनाथ मुलांची माहिती त्यांच्याकडे पाठवावी तसेच जास्तीत जास्त गरजू पर्यंत ही माहिती पोहचवावी, कारण आपल्यामुळे एखाद्या अनाथाच्या शिक्षणाला हातभार लागू शकतो असे भावनिक आवाहनसुद्धा यावेळी त्यांनी केले असून यासाठी त्यांनी संपर्क करण्यासाठी 9168844792, 9604446868, 9890850106 या मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे सांगितले आहे..
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प