सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सेवा विभागाच्या कार्यकर्त्यांनी केले कोरोना निर्मूलन जनजागृती अभियान..

बुलढाणा : राष्ट्रीय आपत्ती ठरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावणे जनजीवन पूर्णपणे बाधित झालेले आहे.

Sudarshan MH
  • May 9 2021 4:40PM

(योगेश शर्मा)
बुलढाणा : राष्ट्रीय आपत्ती ठरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावणे जनजीवन पूर्णपणे बाधित झालेले आहे. नाईलाजास्तव शासनाला पुन्हा संचारबंदी करण्यासारखे पाऊले वारंवार उचलावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांकडून याबद्दल जाणीवपूर्वक लक्ष न देणे होय. या गंभीर प्रकाराला आळा घालणे अतिआवश्यक असल्याने राष्ट्र सेवेसाठी सदैव अग्रेसर असणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे अभिनव उपक्रम करत कोरोना निर्मूलन जनजागृती अभियान आज राबविण्यात आले. याद्वारे लोकांना जागरूक करण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले.
आज दिनांक ९ मे शनिवार रोजी बुलढाणा जिल्हयातील चिखली मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाच्या जवळपास पन्नास कार्यकर्त्यांनी एकत्र येत अभिनव उपक्रम करत कोरोना निर्मूलन जनजागृति अभियान राबविले. यावेळी शहरातील ८ ते ९ प्रमुख चौकात स्वयंसेवकांनी हातात कोरोनापासून बचाव करणाऱ्या घोषणांचे फलकं घेऊन नागरिकांना जागरूक करण्याचा अभिनव उपकम राबविला. यावेळी स्वयंसेवकांनी कोविड - १९ च्या नियमांचे पालन करत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या जीवनावर होणारे दुष्परिणामाबद्दल सुद्धा लोकांना सांगितले.
सेवा संघाच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत असे उपक्रम आज काळाची खरी गरज असल्याचे सांगत असे उपक्रम होत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सेवा संघाचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार