सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागरिकांसाठी तयार होत असलेल्या कोविड सेंटरला नागरिकांचाच विरोध..

बुलढाणा : सध्या देशात कोरोना आणि कोरोना बाधितांची वाढणारी संख्याच डोकेदुखी ठरत असतांना याच कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी लागली

Sudarshan MH
  • May 9 2021 8:30PM

राष्ट्रीय आपत्ती ठरलेलला कोरोना कोविड सेंटर भाजलेल्या राजकारणाला बळी पडला..?

स्व. राजाभाऊ बोंद्रे हायस्कुलमध्ये कोव्हिड रुग्णालय  उभारण्यात येऊ नये – परिसरातील नागरिकांनीच केली मागणी..
(योगेश शर्मा)
बुलढाणा : सध्या देशात कोरोना आणि कोरोना बाधितांची वाढणारी संख्याच डोकेदुखी ठरत असतांना याच कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी लागली असतांना एकीकडे शासनाला याच्या प्रादुर्भावाला कमी करण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे तर लोकांचे जीव वाचविण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करत 
असतांना याच लोकांकडून होत असलेला विरोध हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन काळात जिथे सर्वसामान्यांच्या खिश्याला झळ पोहचली आहे, तिथेच या काळात सुद्धा देशात, राज्यात आणि गावागावात भाजलेल्या राजकारणामुळे परिस्थिती विदारक होण्याचे चिन्हे उमटलेले दिसतात तर कुठे बघ्याची भूमिका घेतल्या जाते, या दोन्हीही परिस्थिती भरकटला जातोय तो म्हणजे सामान्य माणूसच..
सध्या कोरोना बाधितांसाठी ऑक्सिजन बेडची उपलब्धता होत नसल्याची बातमी आपण बघतच आहोत, आणि यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे. अश्यातच शासनाद्वारे अनेक खाजगी दवाखान्यांना कोविड सेंटरची परवानगी जरी प्राप्त झाली असेल तरी त्यांना मिळालेल्या परवानगी पेक्षा अधिक रुग्णांचा उपचार सुरू असल्याचे चित्र समोर आहेच, तर खाजगी रुग्णालयात होणारा खर्च सर्वसामान्यांच्या खिश्याला न परवडणारा देखील आहे. तर दुसरीकडे जनसेवक म्हणून वावरणारे या काळात फक्त सुरवातीलाच रस्त्यावर फवारण्या मारून घेताना दिसले, मात्र आज रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतांना नगर परिषद मधील सत्ताधारी असो की विरोधी गटातले कोणीही मोफत कोविड सेंटर उभारणीसाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे कोणासही दिसले नसल्याची खंत आज नागरिक बोलून दाखवत आहे. तर दुसरीकडे शहरात उभारण्यात येणारे मोफत कोविड सेंटर हे राजकारणाचा बळी ठरू पाहत आहे.
असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात घडला असून स्थानिक न प प्रशासनाव्दारे शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या स्व. राजाभाऊ बोंद्रे हायस्कुलमध्ये आमदार श्वेता महाले यांच्या आधार बहुउद्देशीय संस्थेद्वारा ५० खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारण्यात येत आहे. परंतु नागरिकांसाठीच उभारण्यात येणार हे कोविड सेंटर सुरवातीपासूनच नागरिकांमुळेच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून याला खतपाणी घालण्याचे काम राजकीय क्षेत्रातील लोकांनी जमून केल्याचे बोलल्या जात आहे. सुरुवातीला हे कोविड सेंटर जुने गाव मध्ये स्थित माळी भवन मध्ये होणार होते परंतु तेथील स्थानिक काही राजकीय नेते, नगरसेवक आणि लोकांनी तेथे हे कोविड सेंटर न करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याची सुप्त वार्ता आहे. त्यामुळेच नाईलास्तव हे मोफत कोविड सेंटर न.प. शाळा क्र १ मध्ये करण्याचे ठरवून त्याची रीतसर परवानग्या घेण्यात आल्या. परंतु आता त्याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे, मात्र नागरी वस्तीमध्ये हे रुग्णालय उभारु नये अशी भुमीका स्थानिक नगरसेवक आणि परिसरातील नागरिकांनी घेतली असून तशा आशयाचे निवेदन दि ४ मे रोजी स्थानीय नगरसेवकाच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांना दिले आहे.
सदर निवेदनात नमुद करण्यात आले आहे की , स्व. राजाभाऊ बोंद्रे हायस्कुल परिसरात सर्व बाजुंनी दाट लोकवस्ती आहे. तसेच परिसरातील लहान मुले व वयोवृध्द माणसे या शाळेच्या परिसरात खेळण्यासाठी व फिरण्यासाठी सकाळ संध्याकाळ येत असतात. सदर ठिकाणी कोव्हिड रुग्णालय सुरू झाल्यास कोरोना संसंर्ग होण्याचा धोका आहे, त्यामुळे सदर कोव्हिड रुग्णालय या ठिकाणी सुरु करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून याठिकाणी कोव्हिड रुग्णालय सुरु झाल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नं निर्माण झाला तर त्याला न प प्रशासन जबाबदार राहिल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. निवेदनावर परिसरातील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी बुलढाणा व  तहसीलदार चिखली यांना देण्यात आल्या आहेत.
तर दुसरीकडे संपूर्ण शहरात या मागणीबद्दल शहरवासीयांमध्ये विविध प्रकारची प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत असून विरोध करणारे शहराबाहेर स्वतःच्या खर्चाने या प्रकारची सेवा देत मोफत कोविड सेंटर उभारून राष्ट्रीय हित जोपासतील का.? असे सवाल सुद्धा नागरिकांनी उपस्थित केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार