सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बंगालमधील तृणमूलच्या हिंसाचाराचा चिखली भाजपाकडून निषेध

बुलढाणा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार व जाळपोळीच्या घटना घडल्या.

Sudarshan MH
  • May 7 2021 9:39AM

(योगेश शर्मा)
बुलढाणा : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार व जाळपोळीच्या घटना घडल्या. विजयाच्या उन्मादात तृणमूल कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले. यामध्ये सुमारे १४ कार्यकर्त्यांचा बळी गेला. शिवाय अनेक ठिकाणी भाजपा कार्यालयांची जाळपोळ करण्यात आली. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात निदर्शने केली.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर झालेल्या या निदर्शनात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, उपाध्यक्ष भानुदास कुटे, युवराज भूसारी, सुभाषअप्पा मंगरुळकर, किशोर जामदार, अशोक अग्रवाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या निदर्शनात सहभागी झाले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार