सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वंचित च्या धरणे आंदोलनाच्या धसक्याने बी डी ओ तांबे ताळ्यावर

बुलढाणा : रमाई घरकुल योजनेचे अनुदान तात्काळ जमा करण्यासाठी

Sudarshan MH
  • Dec 2 2020 6:45PM
बुलढाणा : रमाई घरकुल योजनेचे अनुदान तात्काळ जमा करण्यासाठी व विविध न्यायिक मागणीसाठी आघाडीचे तालुकाध्यक्ष भाई संघपाल पनाड व युवा अध्यक्ष भाई अनित्य घेवंदे यांचे नेतृत्वात घरकुल लाभार्थी यासह धरणे आंदोलन पंचायत समिती लोणार समोर सुरू करतात या आंदोलनाचा धसका घेत बी डी ओ अस्मिता तांबे या ताळ्यावर आले असून आंदोलनकर्त्यांच्या न्यायिक मागण्या तात्काळ मान्य करत याबाबत लेखी पत्र सुद्धा आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहे 
गेल्या अनेक महिन्यापासून रमाई घरकुल योजनेचे अनुदान हे लाभार्थ्याच्या खात्यात जमा न झाल्याने लाभार्थ्यांना आपला संसार उघड्यावर थाटात रात्र थंडीत कुडकुडत काढावी लागत होती मात्र या गंभीर बाबीची दखल लोणार पंचायत समितीच्या बीडीओ अस्मिता तांबे यांनी न घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष करत कोरोनाचा बहाना करत टाळाटाळ केली मात्र वंचित बहुजन आघाडी च्या धरणे आंदोलनाला सुरुवात करताच पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले . त्या बाबत जि प मुख्यधिकारी एस टी तांयडे बिडीओ अमिस्ता तांबे , विस्तार अधिकारी शंकरराव ढोके , सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा टिटवी सरपंच भगवानराव कोकाटे यांच्या समक्ष आंदोलन कर्त्याना लेखी पत्र देत आंदोलन संपविण्याची विंनती केली लेखी पत्राने आंदोलन कर्त्याचे समाधान झाल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. यावेळी वंचीत तालुका अध्यक्ष भाई संघपाल पनाड, युवा अध्यक्ष भाई अनित्य घेंवदे , प्रा के बी इंगळे , वंसतराव वानखेडे, दता राठोड, ब्रम्हा पाडमुख, सुगत पनाड, सैय्यद अत्तर भाई, फिरोज भाई, अनिल पवार, सुनिल इंगळे ,गजानन सरदार , उषाताई नरवाडे, पवन अवसरमोल, दिपक आंनदराव, सूरेश मोरे, पंजाब पनाड, विनोद वानखेडे, मिंलीद मोरे, समाधान मोरे, शेषराव साळवे , दशरथ भारशंकर , बाळु इंगळे, संदीप गवई , अशोक पनाड, मोहन नवघरे, रामश्वेर झोटे, राजु जााध्प विजय वाघ, लहानु मोरे, सह अनेक लाभार्थ्यी  सह वंचीत कार्यकर्ते उपस्थीत होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार