सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आयुष डॉक्टरांकडून सी.सी.आय.एम. च्या अधिसूचनेचे स्वागत

बुलढाणा : भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्यतंत्र

Sudarshan MH
  • Dec 12 2020 3:19PM
(योगेश शर्मा)
बुलढाणा : भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्यतंत्र विषयातील पदव्युत्तर डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंदर्भात काढलेल्या अधिसूचनेचे स्वागत करण्याकरिता आयुष कृती समितीच्या माध्यमातून राज्यभरातील १,५०,००० पेक्षा अधिक आयुष डॉक्टरांनी गुलाबी फित लावून नियमितपणे वैद्यकीय सेवा प्रदान केली व यासंदर्भात केंद्र शासनाचे स्वागत व अभिनंदन करुन पाठिंबा देणारे पत्र तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. इंडियन मेडिकल असोसिएशनने या  अधिसूचनेला विरोध करण्याकरिता बंदचे आवाहन केले होते परंतु, महाराष्ट्रातील दीड लाख आयुष डॉक्टरांनी त्यात सहभागी न होता नियमितपणे वैद्यकीय सेवा सुरू ठेवून केंद्र शासनाला आपला सक्रीय पाठिंबा दर्शविला.

आयुष कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत चिखली येथील आयुष डॉक्टरांनी गुलाबी फीत लावून आपल्या वैद्यकीय सेवा नियमितपणे सुरू ठेवल्या या अधिसूचनेचे स्वागत करण्याकरिता चिखली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये मोठ्या प्रमाणावर आयुष डॉक्टरांनी सहभागी होत रक्तदान केले. यानंतर चिखलीतील आयुष डॉक्टरांनी तहसीलदारांना भेटून सदर अधिसूचनेचे स्वागत करणारे व पाठिंबा देणारे पत्र सोपविले. याप्रसंगी बोलतांना केंद्र शासनाने भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या माध्यमातून प्रकाशित केलेल्या अधिसूचनेमुळे आयुर्वेदाची प्रगती अधिक गतिमानतेने होण्यास बळ लाभणार असून सामान्य माणसाला विशेषज्ञता सेवा मिळणे अधिक सोपे होणार असल्याचे आयुष कृती समितीचे सचिव तथा महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की विविध पॅथिंमधील भेदभाव व एकाधिकारशाहीचा अहंकार जपण्यापेक्षा सामान्य माणसाला अधिकाधिक, उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्याकरिता समन्वयाचा मार्ग इंडियन मेडिकल असोसिएशनने स्वीकारावा व हीच काळाची गरज आहे असे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी डॉ. प्रकाश शिंगणे, डॉ. विकास मगर, डॉ.रवींद्र कमळसकर, डॉ. शिवकुमार मोळवणे, डॉ.स्वप्निल मेहेत्रे, डॉ. संजय लोखंडे, डॉ.विष्णू इंगळे, डॉ. गोपाल लोखंडे, डॉ इर्शाद खान, डॉ.दिपक खेडेकर, डॉ. संदीप म्हस्के, डॉ.जयेश काछवाल, डॉ. बेग, डॉ. अरुण कुटे, डॉ. सुनील केवट, डॉ.पंकज शेटे, डॉ.खान, डॉ.चितरंजन रिंढे, डॉ. पंढरी इंगळे, डॉ.अजय अवचार, डॉ.अमोल परिहार, डॉ.रवी मोरे, डॉ.अर्शद शेख, डॉ. फारुख, डॉ. फराज आदी डॉक्टर्स उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार