सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ग देि मां चे स्मारकासाठी चिखली येथे साहित्यिकांचा जागर

बुलढाणा : महाकवी ग दि माडगुळकर यांचे पुणे येथे स्मारक व्हावे या मागणीसाठी येथील साहित्यिकांनी जागर केला

Sudarshan MH
  • Dec 14 2020 6:43PM
(योगेश शर्मा)
.
बुलढाणा : महाकवी ग दि माडगुळकर यांचे पुणे येथे स्मारक व्हावे या मागणीसाठी येथील साहित्यिकांनी जागर केला.ग दि मा यांच्या कवितांचे वाचन व त्यांची गीते सादर करून त्यांना आदरांजली देण्यात आली.
         माडगुळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील खटकेश्र्वर महाराज संस्थान परिसरात हा जागर करण्यात आला.
         कथाकार बबन महामूने,कवी गिरीश दुबे इत्यादींनी गदि मा यांच्या प्रतिमेला पुष्प वाहिले.
गदिमा यांच्या जीवनावर प्रकाश टाकत गिरीश दुबे यांनी त्यांच्या स्मारकाची गरज व्यक्त केली.
प्रशांत पाटील,शत्रुघ्न कुसुंबे,मनोहर पवार या कवींनी गदिमांच्या कविता  उत्तमपणे सादर केल्या.
         शहरातील ज्येष्ठ गायक भिमराव शास्त्री पवार , विलास  खंदारे ,विनोद महाराज खंदारे या चमूने गदिमा यांचे ' गीत रामायण ' मधील काही भाग सादर केला.
ज्येष्ठ अधिवक्ता व कवी विजयकुमार कस्तुरे यांनी गदिमा यांना आपल्या गिताद्वारे
आदरांजली वाहिली.
    यावेळी ज्ञानेश्वर पंचांगे, भिमराधांडे, मंगला महामुने, किसान उगले,
विद्या सोनुने, भारत महामूने, भगवान पाटील, भूषण महामुने इत्यादी साहित्यिक उपस्थित होते.

यावेळी सर्व उपस्थित साहित्यिक व इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन सरकारकडे गदिमा यांच्या स्मारकासाठी निवेदन करण्यात येणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार