सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चिखली येथील बौद्ध स्मशानभूमीत कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिक लोकांनी केले विरोध..

बुलढाणा : चिखली येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात एका ५० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर त्याचा अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह चिखली येथील बौद्ध स्मशानभूमीत नेण्यात आल्यावर स्थानिकांनी मृतदेह त्या ठिकाणी जाळण्यास कसून विरोध केल्यानंतर

Sudarshan MH
  • Apr 29 2021 9:49PM

नाईलाजस्तव न.प. कर्मचाऱ्यांनी मृतदेह दुसरीकडे हलवले..
(योगेश शर्मा)
बुलढाणा :   चिखली येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात एका ५० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर त्याचा अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह चिखली येथील बौद्ध स्मशानभूमीत नेण्यात आल्यावर स्थानिकांनी मृतदेह त्या ठिकाणी जाळण्यास कसून विरोध केल्यानंतर न.प. कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव ते मृतदेह तेथून हलवावे लागले. जवळपास दोन तास पेक्षा अधिक वेळ चाललेल्या या गोंधळानंतरही न.प. कर्मचाऱ्यांव्यतिरीक्त प्रशासनातील इतर कोणतेही अधिकारी यावेळी हजर झाले नाही. तर स्मशानभूमी लगत असलेल्या वस्तीमधील लोकांनी आपल्या आरोग्याला धोका पोहचू नये करिता हे पाऊल उचलल्याचे म्हंटले आहे.
प्रत्येक धर्मात त्यांनी नेमलेल्या ठिकाणीच कोणत्याही मृतकाचे अंत्यसंस्कार करण्यात यावे हे अलिखित सत्य आहे. याकरिताच आज दिनांक २८ एप्रिल रोजी चिखली येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयात मागील चार पाच दिवसांपासून कोरोनाच्या उपचारासाठी भर्ती असलेले बाबुराव लहाने वय ५० वर्ष, रा. खैरव ता. सिंदखेडराजा यांचा मृत्यु झाल्यावर रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या मृतदेहाची व्हिलेवात लावण्याकरिता स्थानिक न. प. प्रशासनाला नेहमीप्रमाणे माहाती दिली असता, न.प. कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह स्थानिक बौद्ध स्मशानभूमीत नेले. परंतु ही बातमी वाऱ्यासारखी स्मशानभूमिलगत असलेल्या वस्ती मध्ये पोहचल्यावर स्थानिक लोकांनी तो मृतदेह तिथे जाळण्यापासून जोरदार विरोध केला. मात्र यावेळी आपलेच समाज बांधव आपल्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार सुद्धा करू देत नसल्याचा खंत आणि शेवटच्या घटकेला या प्रकारे मृतदेहाची याप्रकारे अवहेलना व्हायला हवी नव्हती असे आम्हास वाटते असे मृतकाच्या नातेवाईकांनी बोलून दाखवले.
यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी सांगितले की, भाऊ २०-२५ किलोमीटरच्या आत जर आमचे गाव असते तर आम्ही कमी लोकांमध्येच का होईना, आमच्या प्रथेनुसार अंत्यविधी पार पाडला असता, मात्र आम्ही सिंदखेडराजा तालुक्यातील आहोत, अगोदरच दवाखान्याचा खर्च झेपत नव्हता तरी जीव वाचवण्यासाठी ते केले, आणि आज नियतीने आमचा माणूस आमच्यापासून दूर नेल्यावर अतोनात दुःख झाले. सहजच कुणालाही वाटते की आपल्या माणसाला आपल्याच स्मशानभूमीत नेऊन अंत्यविधी पार पाडावे, त्याकरिताच इथे आणले, परंतु आता इथले स्थानिक लोकांची नाराजगी असेल तर आम्ही जिथे हे लोक नेतील तिथे जाऊन अंत्यविधी करू...
तर दुसरीकडे स्थानिक लोकांचा रोष होता की, स्मशानभूमीलगत आमचे घरे आहेत, आणि तुम्ही कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीला इथे जर जाळले तर त्याचा धूर आमच्या घरात जातो, आणि याचा त्रास आमच्यासह आमच्या लेकराबाळांवर होऊ शकतो, त्याची जबाबदारी कोण घेणार..? असा सवाल स्थानिक लोकांनी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार