सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सर्वसाधारण पाऊसमान, पिकांना भाव मिळणार नाही, तर यंदाही रोगराईचं संकट; भेंडवळची भविष्यवाणी जाहीर

बुलडाणा : अखेर आज प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित जाहीर झाले आहेत.

Sudarshan MH
  • May 15 2021 11:39AM



बुलडाणा : अखेर आज प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित जाहीर झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करत 350 वर्षांहून अधिक अशा भेंडवळच्या भविष्यवाणीची (Buldhana Bhendwal Bhavishyavani 2021) परंपरा अखंडित ठेवली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही देशावर रोगराईचे संकट मोठ्याप्रमाणावर असून देशात आर्थिक टंचाई भासणार असल्याचं सांगितलं आहे.

देशातील रोगराईबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

यावर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार.
कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

देशावरील संकटावर काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

देशाच्या प्रधानावर ही संकट आहे असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.
देशाच्या सरंक्षण खात्यावर दबाव, ताण राहणार आहे.
देशात घुसखोरीचा प्रभाव जास्त राहील.
पृथ्वीवर मोठं संकट येईल तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासेल.

राजकीय क्षेत्राबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

देशाच्या राजाची गादी कायम राहणार
राजाला म्हणजे पंतप्रधान यांना अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार