स्थानिक गुन्हे शाखेने रेती माफियांना रंगेहात पकडले!
बुलडाणा :- जिल्ह्यात रेती माफिया मोकाट आहेत.जिल्हा महसूल प्रशासन
(योगेश शर्मा)
बुलडाणा :- जिल्ह्यात रेती माफिया मोकाट आहेत.जिल्हा महसूल प्रशासन गौण खनिज माफियांवर कारवाई करण्यास निष्क्रीय ठरत असले तरी आज दि १ डिसेंबर २०२० रोजी सकाळच्या सुमारास गुप्त जणांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून रेस्ट हाऊस समोर चिखली येथे 3 ब्रास रेती किंमत १५ हजार रुपये, एक अशोक लेलँड कंपनीचे विनानंबर टिप्पर ट्रक किंमत 30 लाख असे एकूण 30 लाख 15 हजार रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री अरविंदजी चावरिया सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बजरंग बनसोडे सर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. बळीराम गीते साहेब यांचे आदेशाने पोलीस स्टेशन चिखली अंतर्गत विनापरवाना गौण खनिज रेती चोरी करून वाहतूक प्रकरणी आरोपी (चालक) राजू संजय शिंगणे (वय 25) रा. डोंगरखंडाळा याला रंगेहाथ पकडून याच्यावर भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल करून अन्वये कारवाई करून सदर वाहन मुद्देमाल आणि आरोपी पोलीस स्टेशन चिखली यांच्या ताब्यात देण्यात आले.
हि कार्यवाही पथक पो.हे.का. सय्यद हारून/७५६, पो.ना. लक्ष्मण कटक/९५, पो.ना. रघुनाथ जाधव/१०४२, पो.का. श्रीकांत चिंचोले/२२३०, चालक शेख शाहनवाज/११३३ यांनी केली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प