प्रतिनिधी: दिपक चव्हाण पुणे
राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र अयोध्या नगरी मध्ये भव्य राममंदिर निर्माणाचे कार्य सुरु आसुन. त्यासाठी संपूर्ण देशभरात राम मंदीर ट्रस्ट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल संत संप्रदाया द्वारा निधि संकलन अभियान सुरू आसुन राम मंदीर निर्माण कार्यात सर्वाच योगदान असावे ह्या उद्देशान निधि संकलन अभियानाची सुवास केली आसुन ह्या अभियानामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी वतीने एक कोटी रुपयांचे निधि भगावन प्रभु रामचंद्रा च्या चरणीं समर्पण करण्यात आले.
पिंपरी चिंचवड प्राधिकरण येथील सावरकर भवन येथे विश्व हिंदू परिषदेचे अखील भारतीय महामंत्री विनायक देशपांडे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांच्याकडे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते समर्पण निधी सुपूर्त करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी खासदार अमर साबळे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह विलास लांडगे, महापालिका स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश सचिव अमित गोरखे, उपमहापौर केशव घोळवे, माजी महापौर नितीन काळजे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगिरी, नगरसेवक शीतल शिंदे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेविका शारदा बाबर, कमला घोलप, बोराडे, उत्तम केंदळे, सविता खुळे, झामाबाई बारणे, अनुराधा गोरखे, जिल्हा सरचिटणीस विजय फुगे, बाबू नायर, महिला अध्यक्षा उज्ज्वला गावडे, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष अनुप मोरे, सारिका सस्ते, माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक बाबा त्रिभुवन, शांताराम भालेकर, सुरेश म्हेत्रे, कुंदन गायकवाड, महिला प्रदेश कोशाध्यक्षा शैला मोळक, नगरसेवक बारणे, दत्ता गव्हाणे, स्वीकृत प्रभाग सदस्य वैशाली खाडे, मंडल अध्यक्ष विजय शिनकर आदींसह नगरसेवक, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचा परिचय जिल्हा सरचिटणीस ऍड. मोरेश्वर शेडगे यांनी केला. जिल्हा सरचिटणीस राजु दुर्गे यांनी आभार मानले.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे म्हणाले की,आयोध्या निगर म्हदे भव्य राम मंदिर निर्माणा सुरू झाले आसुन त्या कार्या साठी निधी संकलन अभियाना द्वारा सर्व राम भक्तांनी आवाहन केले होते.या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून सर्व सामान्यान पासुन तर मोठ्या उद्योगपति,पर्यत ह्या कार्या साठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे.त्याच बरोबर पिंपरी-चिंचवड शहरवासीयांचाही याकामी खारीचा वाटा असावा असा आमचा संकल्प आहे. शहरातील सर्व नागरिक व भाजपाचे सर्व नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुढाकार घेत समर्पण निधी जमा करीत आहेत. तसेच, श्रीराम हे संपूर्ण भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिर निर्माण निधीला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरवासीयांनी एकोप्याने हा निधी उभा केला. त्या सर्व लहान- थोरांचे मी आभार मानतो.