सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भावानेच केला बहिणीवर अत्याचार, नराधम भावास कोठडी .

भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

Sudarshan MH
  • Jan 26 2021 8:09PM
 
 
नांदेड /अर्धापूर (अरविंद जाधव) :-भाऊ- बहिणीचे पवित्र नाते समजले जाते. या पवित्र नात्यालाच काळीमा फासणारी घटना घडल्याने विश्वास तरी कोणावर ठेवावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात सख्या भावाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून भावाविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात आई वडील काही कामानिमित्ताने बाहेर गेले होते. यावेळी भावाने आपल्या सख्या बहिणीवर अत्याचार केला. ही घटना जुन 2020 ते ता. 27 नोव्हेंबर 2020 या काळात तीन ते चार वेळा हा घृणास्पद प्रकार घडला होता. तसेच ही घटना आई- वडिलांना सांगितलीस तर जीवे मारण्याची धमकी दिली.
सदरील मुलीचे लग्न न झाल्याने आपली समाजात बेआब्रु होईल म्हणून सदरील घटना कोणालाही सांगितली नाही. दरम्यान सदरील पिडीत मुलीचे लग्न 27 नोव्हेंबर २०२० ला हिंगोली जिल्ह्यातील तरुणाशी झाले. त्यानंतर सदरील घटना पिडीत मुलीने आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर पती- पत्नीने अर्धापूर पोलिस ठाण्यात दिनांक 25/1/2021वार सोमवार रोजी फिर्याद दाखल केली. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी भावाविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सदरील आरोपी भावास पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजार केले. यावेळी न्यायालयाने त्याला गुरुवार (ता. 28) जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार बळीराम राठोड करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार