तारापूर आद्योगिक क्षेत्रातील Moltus Research Laboratories Pvt. Ltd कंपनीचे घातक रसायन आढळले कोळगावच्या गोदामात
बोईसर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन निघालेले घातक रसायनाचा मोठा साठा
बोईसर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन निघालेले घातक रसायनाचा मोठा साठा पालघर कोळगाव जेनेसीस येथील औद्योगिक क्षेत्रात लपविण्यात आला आहे. बेकायदेशीर पणे याठिकाणी मोठ्या प्रमाणात रसायन ड्रम व रासायनिक घनकचरा साठवून ठेवला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळीची पाहणी करून तपास सुरू केला आहे. याठिकाणी अतिशय उग्र वास असलेला घातक रासायनिक घनकचरा व रसायन बोईसर येथील केमिकल माफियांनी ठेवले असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रसायन व रासायनिक घनकचऱ्यांचा साठा बेकायदेशीर वाहतूक करून कोळगाव येथील जेनेसीस औद्योगिक क्षेत्रातील गोदामा मध्ये साठवून ठेवल्याचे उघड झाले आहे. बोईसर अवधनगर भागातील "अजगर" केमिकल माफियांनी हा रासायनिक घनकचऱ्यांचा साठा याठिकाणी बेकायदेशीर पणे साठवून ठेवल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. या ठिकाणी असलेल्या गोदामाची पाहणी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी दुपारच्या वेळी केली असून याठिकाणी सापडलेले रसायन व रासायनिक घनकचरा कोणत्या कारखान्यांचा आहे. याची माहिती मिळण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला तातडीने पत्र देवून हा साठा कोणी केला याचा तपास सुरू करण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे बोईसर युनिटचे पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील यांनी सांगितले.
◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मोल्टास या कारखान्यातील घातक रसायन याठिकाणी आणून टाकल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांन कडून मिळाली आहे. अवधनगर येथील केमिकल माफिया "अजगर" यांने त्यांच्या कोळगाव जेनेसीस येथील गोदामात साठा केल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. यातच कोळगाव जेनेसीस याठिकाणी ज्या गोदामात साठा मिळाला आहे त्याठिकाणी साधारण दोन वर्षांपूर्वी पालघर पोलिसांनी देखील कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
◾अतिशय घातक असलेल्या रसायन बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी वरून देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत उपप्रादेशिक अधिकारी यांना संपर्क साधण्यासाठी सांगितले. मात्र उपप्रादेशिक अधिकारी वारंवार फोन करून देखील प्रतिसाद देत नसल्याने हा घातक रसायनाचा साठा बाबत योग्य ती कारवाई करण्यासाठी विलंब लागत आहे.
◾ प्रदूषणाचा ठपका ठेवून मोल्टास या कारखान्याला बंदीचे आदेश साधारण दोन महिन्यापूर्वी देण्यात आले होते. मात्र प्रदूषणकारी कारखान्यांने आपले प्रदूषण सुरूच ठेवले असून या कारखान्याला स्थानिक क्षेत्र अधिकारी पाठबळ देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प