सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत नेत टीका करायचे-- फडणवीस

भाजप शिवसेनेची युती करुन सत्तेत नसती तर कारभार अधिक चांगला आणि वेगवान झाला असता. काही कठीण निर्णय वेगाने घेता आले असते, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Snehal Joshi .
  • Aug 23 2020 6:48PM
2014 ते 2019 दरम्यान राज्यामध्ये भाजप शिवसेनेची युती करुन सत्तेत नसती तर कारभार अधिक चांगला आणि वेगवान झाला असता. काही कठीण निर्णय वेगाने घेता आले असते, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च आणि अशोका विद्यापिठातील त्रिवेदी सेंटर फॉर पॉलिटिकल डेटाने संयुक्तरित्या आयोजित करण्यात आलेल्या एका ऑनलाइन पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान फडणवीस बोलत होते. शिवसेना जरी सत्तेमध्ये होती तरी सरकारने काही निर्णय घेतल्यानंतर ते स्वत:ला विरोधी पक्षाच्या भूमिकेत नेत टीका करायचे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. दरम्यान, काही काळाने तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. मी त्यानंतर मला हवं ते मी करणार अशा भूमिकेत गेलो. मी माझ्या मंत्रीमंडळाचा कारभार करताना अनेक निर्णय हे एकमताने घेतले. मला यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागायची, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार