सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

व्यापारी व त्यांचे कर्मचारी यांना कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय- तुगलकी - आ. गिरीश व्यास

नागपूर शहरात अंदाजे 50 हजाराच्या वर व्यापारी आहे. या प्रत्येक व्यापाराकडे 10 ते 15 कर्मचारी असून किमान 5 लाख टेस्ट करावे लागेल आणि इतक्या कमी वेळात 5 लाख टेस्ट करणे कसे शक्य आहे का?

Snehal Joshi .
  • Aug 14 2020 7:50PM
नागपूर शहरातील 30 लाखाचा लोकसंख्ये मध्ये केवळ नागपूर शहरातील व्यापारी व त्यांच्या कर्मचायांचीच कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय तुगलकी आहे. हा निर्णय केवळ व्यापारी व कर्मचाÚयासाठी का? कुठल्याही शासकीय कर्मचाÚयांकरीता कोरोना टेस्ट करण्याचा अश्या पद्धतीचा आदेश किंवा निर्णय निघालेला नाही. त्यांच्या परिवारांचा काय? त्यामुळे ज्या गोष्टीचा पालन करायला पाहिजे उदाहरणार्थ सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दी करणे टाळणे, एकतरफा दुकान बंद हे कसोटीने पाळण्याकरीता नियम लावणे सोडून या पद्धतीने मार्गदर्शन आणि अध्यादेश लावता आहेत. नागपूर शहरात अंदाजे 50 हजाराच्या वर व्यापारी आहे. या प्रत्येक व्यापाराकडे 10 ते 15 कर्मचारी असून किमान 5 लाख टेस्ट करावे लागेल आणि इतक्या कमी वेळात 5 लाख टेस्ट करणे कसे शक्य आहे का? या आगोदरच कोरोनाच्या संकट काळामधे व्यापाराच्या झालेल्या दुर्दशेमुळे व्यापारी आगोदरच दुखी आहे आणि पुन्हा त्यांच्यावर कोरोना टेस्ट करण्याची सक्ती करणे हे कितपत योग्य आहे. राज्या मध्ये कुठल्याही महानगर पालिकेने अश्या प्रकारचा किंवा अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला पाहण्यात किंवा वाचण्यात आलेला नाही. मग नागपूरातच हा निर्णय का? नागपूर पेक्षा अंदाजे पूणे येथे 1 लाख 17 हजार 516 मुंबई येथे 1 लाख 27 हजार 571 कोरोना संक्रमित असतांना येथे हा निर्णय घेण्यात आलेला नाही. मग नागपूरलाच हा निर्णय का? असा प्रश्न प्रदेश प्रवक्ता आमदार गिरीश व्यास यांनी केलेला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार