सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एनएमआरडीए अंतर्गत असलेले भूखंड नियमित करा -बावनकुळे

सध्या नागपूर शहरालगत एनएमआरडीए अंतर्गत असलेल्या भूखंडांचे कोणतेही शुल्क न आकारता नियमितीकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सरचिटणीस तथा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

Snehal Joshi .
  • Aug 11 2020 7:04PM
सध्या नागपूर शहरालगत एनएमआरडीए अंतर्गत असलेल्या भूखंडांचे कोणतेही शुल्क न आकारता नियमितीकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सरचिटणीस तथा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.
यासंदर्भात एका निवेदनातून श्री. बावनकुळे म्हणतात- नागपूर शहराचे क्षेत्रफळ आता वाढत आहे.शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात आता मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास जाऊ लागले आहेत. अनेक भूखंडांवर इमारती उभ्या झाल्या आहेत. नागपूर, ग्रामीण, कामठी, हिंगणा, असा संपूर्ण भाग नागपूर शहराला लागून असून तो आता एनएमआरडीएच्या कार्यकक्षेत येतो. यापूर्वी अनधिकृत लेआऊटमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी भूखंड विकले. त्या भूखंडंचे कोणतेही नियमितीकरण केले नाही.
एनएमआरडीएचे गठन होण्यापूर्वी या भागात अनेक अनधिकृत लेआऊट तयार झाले. अनेक उद्योग आल्याने लोकांची या भागात वस्ती वाढली. बहुतेकांनी पकी घरे बांधली. या अनधिकृत लेआऊटला आता नियमित करणे गरजेचे झाले आहे. हा सर्व परिसर आता पिवळ्या पट्ट्यात (यलो झोन)मध्ये आला आहे. त्यामुळे नागरिक येथे वास्तव्य करीत असलेले भूखंड आणि अनधिकृत लेआऊटचे नियमितीकरण करण्यासाठी शासनाने स्वत: पुढाकार घ्यावा. विशेष म्हणजे कोणतेही शुल्क या नियमितीकरणासाठी आकारण्यात येऊ नये, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
या भागाचे आपण मागील १५ वर्षे आमदार राहिलो आहे. त्यामुळे या भागातील समस्यांची माहिती आहे. भूखंडांचे नियमितीकरण करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. संपूर्ण प्रस्ताव तयार आहे. फत शासनाने पुढाकार घेऊन त्यावर शिकामोर्तब करावे आणि नागरिकांना त्यांच्या भूखंडाच्या रजिस्ट्री करून द्याव्यात, अशी मागणीही या निवेदनातून बावनकुळे यांनी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार